सर्जरीनंतर पांड्या व्हिलचेअरवर... चालताना होतोय त्रास, शेअर केला VIDEO

सर्जरीनंतर पांड्या व्हिलचेअरवर... चालताना होतोय त्रास, शेअर केला VIDEO

हार्दीक पांड्यावर सर्जरी यशस्वी झाली आहे. फोटोनंतर पांड्याने व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

  • Share this:

लंडन, 09 ऑक्टोबर : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर गेल्याच आठवड्यात सर्जरी झाली. त्यानंतर पांड्याने मंगळवारी रात्री एक व्हिडिओ शेअर केला. हॉस्पिटलमध्ये असलेला पांड्या बे़डवरून उठल्यानंतर दुसऱ्याच्या आधारानं चालताना दिसत आहे. त्यानंतर व्हिलचेअरवर बसताना दिसत आहे. पांड्या सध्या लंडनमध्ये असून त्याच्यासोबत फिजिओथेरपिस्ट योगेश परमारदेखील आहेत.

सर्जरी झाल्यानंतर हार्दीक पांड्याने फोटो शेअर करताना म्हटले होते की, “सगळ्यांच्या प्रार्थनांसाठी आभार. मी लवकरच कमबॅक करेन”, असे लिहिले होते. गेल्या वर्षी दुबईमध्ये झालेल्या आशियाई कप दरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. मात्र त्यानंतरही पांड्यानं आयपीएल, वर्ल्ड कप आणि दक्षिण आफ्रिका दौरा खेळला होता. मात्र कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती.

दुखापतीतून सावरण्यासाठी पांड्याला वेळ लागेल. त्यामुळे बांगलादेश विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी पांड्या मैदानात उतरणार नाही. बांगलादेश विरोधात 3 नोव्हेंबरपासून मालिका सुरू होणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर पांड्याला विश्रांती दिली होती. त्यामुळं आयपीएल 2020आधी पांड्या मैदानावर दिसू शकतो.

25 वर्षांच्या पांड्यानं 11 कसोटी सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. यात 532 धावा केल्या आहेत. तर 54 एकदिवसीय सामन्यात 937 धावा केल्या आहेत तर 54 विकेट घेतल्या आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 सामन्यात 310 धावा आणि 38 विकेट घेतल्या आहेत.

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

First published: October 9, 2019, 8:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading