‘मला आजही रडू आवरत नाही,’ हार्दिक पांड्यानं शेअर केला वडिलांचा भावुक VIDEO

‘मला आजही रडू आवरत नाही,’ हार्दिक पांड्यानं शेअर केला वडिलांचा भावुक VIDEO

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) वडील हिमांशू पांड्या (Himanshu Pandya) यांचं नुकतंच हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे. या घटनेच्या दोन आठवड्यानंतर हार्दिकनं वडिलांचा एक जुना भावुक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे.

  • Share this:

चेन्नई, 2 फेब्रुवारी :  भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिली टेस्ट शुक्रवारपासून चेन्नईत सुरु होत आहे. चार टेस्टच्य़ा या मालिकेसाठी पहिल्या दोन टेस्टसाठी टीम इंडियाची (Team India) निवड झाली आहे. भारताचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) देखील या टीमचा सदस्य आहे. हार्दिकनं 2018 नंतर पहिल्यांदाच टेस्ट टीममध्ये पुनरागमन केलं आहे. हार्दिकनं या टेस्टसाठी चेन्नईमध्ये सरावाला सुरुवातही केली आहे. पण त्याचवेळी वडिलांच्या आठवणीनं तो अस्वस्थ आहे.

हार्दिकचे वडील हिमांशू पांड्या (Himanshu Pandya) यांचं नुकतंच हृदय विकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे. त्यांच्या निधानानं हार्दिक आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) या भावानंर दु:खाचा डोंगर कोसळला. बडोदा (Bardoa) टीमचा कॅप्टन असलेल्यानं कृणालनं ही बातमी समजताच सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून माघार घेतली होती.

(हे वाचा-‘विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये खेळाडू घाबरतात’, माजी क्रिकेटपटूचा आरोप)

या घटनेच्या दोन आठवड्यानंतर हार्दिकनं वडिलांचा एक जुना इमोशनल व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. हिमांशू नवी कार घेण्यासाठी शोरुममध्ये गेले होते, तेंव्हाचा हा फोटो आहे. त्यावेळी त्यांना एक कार खूप आवडली. हार्दिकनं ती कार आधीच त्यांच्यासाठी खरेदी केली होता. पण हिमांशू यांना त्याची कल्पना नव्हती. हार्दिक त्यांना व्हिडीओ कॉलवर ही गाडी भेट दिल्याचं सांगतो. त्यावेळी हिमांशू आश्यर्यचकित होतात.

कृणालचं भावूक पत्र

कृणाल पांड्यानं काही दिवसांपूर्वी दिवंगत वडिलांना इन्स्टाग्रामवर एक भावनिक पत्र लिहिलं आहे. 'प्रिय पप्पा, तुम्ही आमच्यासाठी काय आहात, हे सांगायला 100 पुस्तकही कमी पडतील. तुमच्यामुळेच आम्ही या उंचीपर्यंत पोहोचलो आहोत. तुम्ही आता आमच्यामध्ये नाही, हे स्वीकारणंही मला कठीण जात आहे. खूप साऱ्या चांगल्या आठवणी सोडून तुम्ही गेलात, मी जेव्हा तुमचा विचार करेन तेव्हा या आठवणींमुळे मी नेहमीच हसेन. आम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतलीत. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलात, तसंच स्वत:वरही विश्वास ठेवायला शिकवलंत.

(हे वाचा-IND vs ENG: टेस्ट सीरिजपूर्वी टीम इंडियाची पहिल्यांदाच प्रॅक्टिस, पाहा PHOTOS)

तुमच्यासोबत भांडायला, तुम्हाला त्रास द्यायला, तुमच्यासोबत गॉसिप करायला मजा यायची. स्पर्धेसाठी जाण्याआधी आपण घराच्या खाली फोटो काढला, ही आपली शेवटची भेट असेल, हे हे मलाही माहिती नव्हतं. तुम्ही मला सोडून गेलात, यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. ही पोकळी कशी भरून काढायची, हे मला कळत नाही. पण तुमचं आयुष्य मी सेलिब्रेट करेन, कारण तुम्ही आयुष्य जगलात. तुम्ही माझ्यासोबत कायम राहाल. हे घर तुमच्याशिवाय तसं कधीच नसेल. आम्हीही आता तुमच्याशिवाय तसेच नसू, पण तुम्ही जिकडे असाल तिकडून आम्हाला बघत असाल, जसे इकडेही आमच्याकडे लक्ष ठेवायचात. आयुष्याबद्दल खूप गोष्टी शिकवल्याबद्दल धन्यवाद. आमचा तुम्हाला अभिमान वाटेल, असंच आम्ही वागू. ढोसा मला तुमची कायमच आठवण येईल. माझे रॉकस्टार आणि माझे शिक्षक' अशी भावनिक पोस्ट कृणालनं लिहली होती.

Published by: News18 Desk
First published: February 2, 2021, 5:18 PM IST

ताज्या बातम्या