हातात 1.3 कोटींचं घड्याळ घालून उपचार घेतोय भारतीय क्रिकेटपटू

हातात 1.3 कोटींचं घड्याळ घालून उपचार घेतोय भारतीय क्रिकेटपटू

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दीक पांड्या सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून नुकतीच एक सर्जरी यशस्वी झाली.

  • Share this:

मुंबई, 07 ऑक्टोबर : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दीक पांड्या सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. गेल्या आठवड्यात त्याच्यावर इंग्लंडमध्ये सर्जरी झाली. त्यानंतर पांड्याने फोटो शेअर करताना सर्जरी यशस्वी झाल्याचं सांगितलं. यावर अनेकांनी लवकर बरा हो आणि मैदानावर परत ये असं म्हटलं आहे.

इंग्लंडमध्ये पांड्यावर सर्जरी झाली. त्याने फोटो शेअर करताना म्हटले की, “सगळ्यांच्या प्रार्थनांसाठी आभार. मी लवकरच कमबॅक करेन”, असे लिहिले आहे. गेल्या वर्षी दुबईमध्ये झालेल्या आशियाई कप दरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. मात्र त्यानंतरही पांड्यानं आयपीएल, वर्ल्ड कप आणि दक्षिण आफ्रिका दौरा खेळला होता. मात्र कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती.

दरम्यान आता पांड्याने शेअर केलेल्या फोटोची वेगळ्याच कारणाने चर्चा रंगली आहे. पांड्याने हातात घातलेल्या घड्याळाबद्दल बोललं जात आहे. हो त्यामागे काऱण आहे त्याची किंमत. पांड्यानं घातलेलं घड्याळ फिलिप नॉटिलसचं आहे. या फोटोत नेमकं कोणतं मॉडेल त्यानं घातलंय हे समजत नाही.

पांड्याच्या हातात असलेलं घड्याळ 5980 / 1R आणि कॅलिबर CH 28‑520 सी यासह सेल्फ-वाइंडिंग रोझ गोल्ड नॉटिलस मॉडेलसारखं दिसत आहे. घड्याळांचे शौकिन असलेल्यांचा हा आवडता ब्रँड आहे. या कंपनीच्या घड्याळांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. पांड्याच्या हातात असलेल्या घड्याळाशी मिळतं जुळतं असलेल्या मॉडेलची किंमत तब्बल 1.3 कोटी इतकी आहे.

सर्जरीनंतर पांड्या काही काळ मैदानापासून लांब राहणार आहे. बांगलादेश विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी पांड्या मैदानात उतरणार नाही. बांगलादेश विरोधात 3 नोव्हेंबरपासून मालिका सुरू होणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर पांड्याला विश्रांती दिली होती. त्यामुळं आयपीएल 2020आधी पांड्या मैदानावर दिसू शकतो.

25 वर्षांच्या पांड्यानं 11 कसोटी सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. यात 532 धावा केल्या आहेत. तर 54 एकदिवसीय सामन्यात 937 धावा केल्या आहेत तर 54 विकेट घेतल्या आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 सामन्यात 310 धावा आणि 38 विकेट घेतल्या आहेत.

SPECIAL REPORT: रोहिणी खडसेंना शिवसेनेचा खोडा, मुक्ताईनगरमध्ये युतीला तडा?

Published by: Suraj Yadav
First published: October 7, 2019, 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading