'पांड्या इज बॅक' धमाकेदार प्रदर्शन करत जिंकून दिला सामना, टीम इंडियाचे 2 दिग्गज फेल

'पांड्या इज बॅक' धमाकेदार प्रदर्शन करत जिंकून दिला सामना, टीम इंडियाचे 2 दिग्गज फेल

गेल्या 5 महिन्यांपासून मैदानातून बाहेर असलेल्या हार्दिक पांड्याने जबरदस्त पुनरागमन केलं असून त्याने संघाला सामनाही जिंकून दिला.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : गंभीर दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहिलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पाच महिन्यानंतर पुनरागमन केलं. त्यानं डीवाय पाटील टी20 टूर्नामेंटमध्ये रिलायन्स वनकडून खेळताना त्याने तडाखेबाज खेळी केली. पांड्याने 25 चेंडूत 38 धावा करत आपण तंदुरुस्त असल्याचं दाखवून दिलं. फक्त फलंदाजीच नाही तर पांड्याने गोलंदाजीतही कमाल केली.

गेल्या वर्षी पाठीच्या दुखापतीमुळे पांड्या पाच महिने क्रिकेटपासून दुरावला होता. त्याच्यासोबत भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि गोलंदाज भुवनेश्वर कुमार हे दोघेही संघातून बाहेर होते. त्यांनीही या सामन्यातून पुनरागमन केलं. मात्र त्या दोघांना अपयश आलं.

हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर रिलायन्स वनने बँक ऑफ बडोदाविरुद्ध 150 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी करायला उतरलेल्या बँक ऑफ बडोदाच्या संघाला 125 धावांपर्यंत मजल मारता आली. रिलायन्सने हा सामना 25 धावांनी जिंकला. पांड्याने गोलंदाजी करताना 5 गडीही बाद केले.

पांड्याने भारताकडून अखेरचा सामना सप्टेंबर महिन्यात खेळला होता. पांड्याला त्यावेळी टी20 सामन्यात दुखापत झाली होती. टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने पांड्याला उपचारासाठी लंडनला पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात पांड्या खेळेल असं म्हटलं जात होतं. पण त्याला संधी मिळाली नाही.

फिटनेस नसल्यानं पांड्याला संधी मिळाली नाही. पुनरागमन करताना पांड्यानं तंदुरुस्त असल्याचं दाखवून दिलं आहे. यानंतर 12 ते 18 मार्च पर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

वाचा : न्यूझीलंडविरुद्ध ख्राइस्टचर्च कसोटीत टीम इंडियाचे 11 खेळाडू करणार 'पदार्पण'

भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांनाही दुखापत झाली होती. त्यांनीही पुनरागमन केलं पण दोघेही फ्लॉप ठरले. धवनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो संघातून बाहेर आहे. रिलायन्स वनकडून त्यानं फक्त 14 धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमारला गोलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. त्यानं फलंदाजी करताना नाबाद 10 धावा केल्या.

वाचा : आर. अश्विन शोधतोय नोकरी? CV पोस्ट केला पण एक गोष्ट 'लपवली'

First published: February 28, 2020, 10:04 PM IST

ताज्या बातम्या