Home /News /sport /

'सचिन-सेहवाग नाही तर वसीम जाफर माझा फेवरेट,' हार्दिक पांड्याने सांगितलं कारण

'सचिन-सेहवाग नाही तर वसीम जाफर माझा फेवरेट,' हार्दिक पांड्याने सांगितलं कारण

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आपल्या नेतृत्वात गुजरात टायटन्सना (Gujarat Titans) चॅम्पियन केलं. आपल्या पहिल्याच मोसमात ट्रॉफी जिंकण्याचा करिश्मा गुजरातला करता आला.

    मुंबई, 7 जून : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आपल्या नेतृत्वात गुजरात टायटन्सना (Gujarat Titans) चॅम्पियन केलं. आपल्या पहिल्याच मोसमात ट्रॉफी जिंकण्याचा करिश्मा गुजरातला करता आला. आयपीएलमधल्या या कामगिरीच्या जोरावर हार्दिक पांड्याने टीम इंडियामध्ये पुनरागमन केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी हार्दिकची टीम इंडियात निवड झाली आहे. या सीरिजआधी दिलेल्या मुलाखतीमध्ये हार्दिकने त्याच्या फेवरेट खेळाडूचं नाव सांगितलं आहे. मुख्य म्हणजे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी किंवा विराट कोहली हार्दिकचा फेवरेट नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) याचं नाव हार्दिकने त्याचा फेवरेट खेळाडू म्हणून घेतलं आहे. हिंदुस्तान टाईम्ससोबत बोलताना हार्दिक म्हणाला, 'मला जॅक कॅलिस, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर आवडतात. अनेक महान क्रिकेटपटू आहेत, त्यांच्यापैकी एक निवडणं कठीण आहे. पण वसीम जाफर माझा फेवरेट आहे. मला त्याची बॅटिंग बघणं आवडायचं. मी त्याच्या बॅटिंगची नक्कल करायचो, पण त्याच्यासारखी बॅटिंग करणं मला कधीच जमलं नाही.' प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जाफरचा दबदबा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जाफरचा दबदबा होता. त्याने 260 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 19,410 रन केले. एवढच नाही तर तो भारताकडून 31 टेस्ट मॅचही खेळला. साल 2000 पासून ते 2008 पर्यंत वसीम जाफर भारतीय टीममध्ये होता. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1944 रन आहेत. याशिवाय त्याने टेस्टमध्ये 5 शतकं आणि 11 शतकंही ठोकली. 212 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. तसंच त्याने भारताकडून 2 वनडेही खेळल्या. आयपीएलमध्ये चमकला हार्दिक गुजरात टायटन्सना चॅम्पियन बनवण्यात हार्दिक पांड्याचा मोठा वाटा आहे. या मोसमात हार्दिकने गुजरातकडून सर्वाधिक 487 रन केले. याशिवाय बॉलिंगमध्ये त्याला 8 विकेट मिळाल्या. राजस्थानविरुद्ध झालेल्या फायनलमध्ये हार्दिक प्लेयर ऑफ द मॅच होता. बॉलिंगमध्ये त्याने 3 विकेट घेतल्या, तर बॅटिंगमध्ये 34 रनची महत्त्वाची खेळी केली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Hardik pandya

    पुढील बातम्या