बेबी पांडयाचे PHOTO पाहिलेत का? नताशाच्या पोस्टवर हार्दिकने केली अशी कमेंट

बेबी पांडयाचे PHOTO पाहिलेत का? नताशाच्या पोस्टवर हार्दिकने केली अशी कमेंट

हार्दिक पांड्या (Hardik Pandya)चा मुलगा अगस्त्य 3 महिन्याचा झाला आहे. यानिमित्त नताशाने अगस्त्यचे काही क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर: भारतीय संघाचा हरहुन्नरी खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या आयपीएल (IPL)मध्ये व्यस्त आहे. त्याचा मुलगा अगस्त्य 3 महिन्याचा झाला आहे. या निमित्ताने नताशाने तिचे आणि अगस्त्याचे काही क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नताशा आणि हार्दिक पांड्या दोघंही सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबाबत ते नेहमीच व्यक्त होतात. फोटोही शेअर करतात. नताशाने शेअर केलेल्या फोटोंना अनेक लाइक्स आणि कॉमेंट्स येत आहेत. हार्दिक पांड्याचे फॅन्स अगस्त्यच्या फोंटोंवर छान कॉमेंट्स करत आहेत.

नताशा स्टॅनकोविच (Natasa Stankovic) ने शेअर अगस्त्यचे आणि तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नताशा काळ्या रंगाच्या वन पिसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. नताशाने पोस्ट केलेल्या फोटोंना नेटकऱ्यांनी आणि स्वत: हार्दिक पांड्यानेही कॉमेंट केली आहे. मी तुम्हा “दोघांना मिस करतोय” असं हार्दिक पांड्या म्हणतोय.

View this post on Instagram

Agastya #3months @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

नताशानं शेअर केलेल्या फोटोंना अनेकांची पसंती मिळत आहे. नताशानं 30 जुलै रोजी गोंडस बाळाला जन्म दिला.  काही दिवसांपूर्वी तिनं टीव्हीवर मॅच पाहताना आणि हार्दिकला चिअर करताना एक फोटो शेअर केला होता. त्यात अगस्त्य देखील मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसला होता.

View this post on Instagram

❤️

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

नाताशा पेशाने मॉडेल आणि अभिनेत्री आहे. सत्याग्रह आणि फुकरे रिटर्न्समध्ये नताशा झळकली होती. नताशा सर्बेरिअन आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 31, 2020, 5:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या