News18 Lokmat

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पांड्या बाहेर, 'या' खेळाडूने घेतली जागा

वादग्रस्त वक्तव्यामुळे झालेल्या वादानंतर हार्दिक पांड्याने भारतीय संघात चांगलं पुनरागमन केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2019 03:53 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पांड्या बाहेर, 'या' खेळाडूने घेतली जागा

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-ट्वेन्टी आणि पाच वनडे सामन्यांची मालिका 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. वनडे मालिकेसाठी भारतीय संघात पांड्याच्या जागी रवींद्र जाडेजाला संधी दिली आहे.

वादग्रस्त वक्तव्यामुळे झालेल्या वादानंतर हार्दिक पांड्याने भारतीय संघात चांगलं पुनरागमन केलं होतं. पण आता पाठीच्या दुखापतीमुळे पांड्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार आहे. त्याच्या जागी गेल्या काही दिवसांपासून संघात आत-बाहेर राहणाऱ्या रवींद्र जाडेजाला संधी मिळाली आहे.

दरम्यान, बीसीसीआयने ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध टी20 आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघांची काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे. कर्णाधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत खेळणार आहे. तर रोहित शर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. त्याला पुन्हा संघात घेण्यात आलं आहे. त्याच्याशिवाय ऋषभ पंत आणि केएल राहुल यांचे पुनरागमन झाले आहे. ऋषभ पंतला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर एकदिवसीय संघात स्थान मिळालं नव्हतं. वादामुळे बाहेर रहावं लागलेल्या केएल राहुललाही संघात स्थान मिळालं आहेत. मात्र या संघात यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा समावेश नाही.

शेवटच्या तीन वनडे सामन्यासाठी ऋषभ पंत, केएल राहुल यांच्याशिवाय भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे. तर कौलला वगळण्यात आलं आहे.

Loading...

पहिल्या दोन वनडे सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी(यष्टीरक्षक), हार्दीक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांच्यासह ऋषभ पंत, सिद्धार्थ कौल आणि केएल राहुल यांना संधी दिली आहे.

शेवटच्या तीन सामन्यासाठी विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी(यष्टीरक्षक), हार्दीक पांड्या, जसप्रीत बुमराह, विजय शंकर, मोहम्‍मद शमी, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात दोन टी20 सामन्यांनी होणार आहे. याचेही नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं आहे. यात उमेश यादव, सिद्धार्थ कौल यांच्यासह मयंक मार्कंडेयला संधी देण्यात आली आहे.

टी20 संघ : विराट कोहली(कर्णधार),रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह, विजय शंकर युजवेंद्र चहल, उमेश यादव, सिद्धार्थ कौल आणि मयंक मार्कंडेय


VIDEO: आर्ची देतेय 12 वीची परीक्षा; पाहिलं का तुम्ही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...