Home /News /sport /

IPL 2022: ठरलं! अहमदाबादने संघाने केली या ‘त्रिमूर्ती’ची निवड, पांड्यासह राशिद खानही होणार मालामाल

IPL 2022: ठरलं! अहमदाबादने संघाने केली या ‘त्रिमूर्ती’ची निवड, पांड्यासह राशिद खानही होणार मालामाल

Hardik Pandya

Hardik Pandya

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये अहमदाबाद हा नविन संघ आहे. या संघाला मेगा लिलावापूर्वी तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचा अधिकार आहे. या अंतर्गत त्यांनी हार्दिक, राशिद आणि शुबमन यांची निवड केली आहे.

    नवी दिल्ली, 18 जानेवारी:आयपीएल 2022  (IPL 2022) चा मेगा लिलाव फेब्रुवारी महिन्यात12 आणि 13तारखेला होणार आहे. पुढच्या हंगामात आठ ऐवजी दहा संघ मैदानात उतरणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन फ्रेंचायझी स्पर्धेत सामील होणार आहेत. मेगा लिलावापूर्वी सर्व संघांना चार खेळाडूंना संघात रिटेन करण्याची परवानगी मिळाली होती. या दोन नवीन फ्रेंचायझींना देखील तीन खेळाडू निवडता येणार आहेत.  दरम्यान, अहमदाबादने (Ahmedabad franchises))हार्दिक पंड्या(Hardik Pandya), राशिद खान(Rashid Khan) आणि शुबमन गिल(Shubman Gill)या त्रिमूर्ती’ची निवड आपल्या संघासाठी केली आहे. मुंबईचा माजी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या , सनरायझर्स हैदराबादसाठी उत्कृष्ट प्रदर्शन केलेला राशिद खान  आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाचा युवा खेळाडू शुबमन गिल हे पुढच्या हंगामात अहमदाबाद फ्रेंचायझीसाठी खेळताना दिसतील. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन संघांना 22 जानेवारीपर्यंत त्यांच्या तीन कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करायची आहेत. अहमदाबादने हार्दिक आणि राशिदला प्रत्येकी 15 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तर युवा शुबमन गिलला अहमदाबाद फ्रेंचायझीत सहभागी होण्यासाठी सात करोड रुपये दिले जाणार आहेत. तत्पूर्वी अहमदाबादने त्यांचा सपोर्ट स्टाफदेखील निवडला आहे. त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये भारताचा माजी गोलंदाज आशीष नेहरा आणि दक्षिण अफ्रिकेचे दिग्गज गॅरी कर्स्टन यांचा समावेश आहे. तसेच इंग्लंडेचे माजी फलंदाज विक्रम सोलंकी देखील अहमदाबाद फ्रेंचायझीचे संचालक असतील. हार्दिक यापूर्वी आयपीएलमध्ये फक्त मुंबई इंडियन्ससाठी खेळला आहे, पण सततच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला संघाने रिलीज केले. आयपीएल 2021 मध्ये हार्दिकने 11 डावात 127 धावा केल्या होत्या. एकही अर्धशतक झळकावता आले नाही. स्ट्राइक रेट 113 होता. पांड्याच्या एकूण टी-20 कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 147 डावात 2797 धावा केल्या आहेत. 8 अर्धशतकेही झळकावली आहेत. स्ट्राइक रेट 142 आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Hardik pandya, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या