विराट कोहलीसाठी आनंदाची बातमी! दोन महिन्यांनंतर फिट झाला स्टार खेळाडू

विराट कोहलीसाठी आनंदाची बातमी! दोन महिन्यांनंतर फिट झाला स्टार खेळाडू

एकीकडे गोलंदाजीमध्ये भारतीय संघ कमकुवत झाला असताना विराटचा खास खेळाडू संघात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज मालिका संपली असली तरी वर्ल्ड कपच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची ठरली. या मालिकेत विराटसाठी डोकेदुखी ठरली ती म्हणजे युवा गोलंदाजांची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. टीम इंडियात जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांसारखे खेळाडू नसल्यामुळं गोलंदाजी काहीशी कमकुवत झाल्याचे दिसून आले. त्यामुळ पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्य़ा वर्ल्ड कपच्या दृष्टीनं हे दोन गोलंदाज महत्त्वाचे आहे. मात्र आता विराटसाठी एक आनंदाजी बातमी म्हणजे पुढच्या मालिकेत हार्दिक पांड्या कमबॅक करू शकतो. याबाबत स्वत: हार्दिक पांड्यानं संकेत दिले आहेत.

दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघातून काहीकाळ बाहेर गेलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आता यशस्वी शस्त्रक्रियेनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमनाची तयारी करत आहे. एवढेच नाही तर मुंबईत झालेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची जर्सी परिधान करून हार्दिक पांड्या मैदानात दिसला. हार्दिकनं आपल्या पुनरागमनाबाबत सांगताना, स्वत:ला क्रिकेटपासून दूर ठेवू शकत नाही. तसेच सध्या हार्दिक मैदानात परत येण्यासाठी मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होऊ इच्छित आहे. त्यासाठी त्याला काही काळ लागणार असल्याचेही त्यानं सांगितले.

वाचा-‘पंत-एक घोटाळा’, नेटकऱ्यांनी ऋषभवर आजीवन बंदी घालण्याची केली मागणी

आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिकनं, ‘पाठदुखी असूनही मी संघासाठी खेळत होतो. क्रिकेटपासून दूर जाईन म्हणून मी मी शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला होत. मात्र यासाठी मी शक्य तितके प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मला वाटत याआधी माझ्या पूर्ण क्षमतेनुसार खेळू शकलो नाही, त्याचे कारण दुखापत होते, त्यामुळे मी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला’, असे सांगितले. तसेच, यावेळी हार्दिक पांड्यानं न्यूझीलंड मालिकेपूर्वी कमबॅक करू शकतो, असेही संकेत दिले.

वाचा-घरच्या मैदानावर रोहित @ 400! एका षटकारासह केला वर्ल्ड रेकॉर्ड

भारतीय संघ पुढीलवर्षी जानेवारी महिन्यात 40 दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत टी20, वनडे आणि कसोटी मालिका खेळेल. हार्दिक पांड्यान भारतासाठी 100पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या दोन महिने क्रिकेटपासून दूर आहे.

वाचा-बंदीनंतर मुंबईकर खेळाडूचा कमबॅक! 175 चेंडूत केली वादळी द्विशतकी खेळी

मानसिकदृष्ट्या निरोगी व्हायचे आहे

हार्दिक पांड्यानं दुखापतीतून पुनरागमन करण्याची ही पहिली वेळ नाही, परंतु यावेळी त्याला मानसिकदृष्ट्या निरोगी रहायचे आहे, असे सांगितले. तसेच, ‘पुनरागमन करणे सोपे नसते. मात्र या दरम्यान कधीच स्वतःला प्रश्न विचारू नका माझ्या सोबत असं का होत आहे? शारीरिकदृष्ट्या मी परत येऊ शकतो, परंतु मानसिकदृष्ट्या निरोगी असणे महत्वाचे आहे. खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात बर्‍याच गोष्टी घडल्या आहेत आणि मी आता मानसिकदृष्ट्या खूप बळकट झालो आहे’, असे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2019 08:18 AM IST

ताज्या बातम्या