मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /लाडक्या लेकासोबत थिरकला हार्दिक, पत्नी नताशानंही दिली साथ! पाहा VIDEO

लाडक्या लेकासोबत थिरकला हार्दिक, पत्नी नताशानंही दिली साथ! पाहा VIDEO

नताशा स्टानकोविच  (Natasa Stankovic) हार्दिक सोबतचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. नताशानं तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

नताशा स्टानकोविच (Natasa Stankovic) हार्दिक सोबतचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. नताशानं तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

नताशा स्टानकोविच (Natasa Stankovic) हार्दिक सोबतचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. नताशानं तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मुंबई, 29 मार्च : भारताचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा मैदानात आणि मैदानाच्या बाहेर दोन्हीकडे सुपर हिट आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या तिसऱ्या वन-डे मध्ये हार्दिकनं 44 बॉलमध्येच 64 रनची खेळी केली. या खेळीत त्याने 5 फोर आणि 4 सिक्स लगावले. हार्दिक आणि ऋषभ पंतच्या आक्रमक भागिदारीमुळेच तिसऱ्या वन-डेचं चित्र पलटलं. भारताच्या मालिका विजयात देखील ही भागिदारी मोलाची ठरली.

मैदानात आक्रमक खेळ करणारा हार्दिक मैदानाच्या बाहेर देखील सक्रीय असतो. हार्दिकची पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टानकोविच  (Natasa Stankovic) हार्दिक सोबतचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. नताशानं तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये नताशा आणि हार्दिकसोबत त्यांचा मुलगा अगस्त्य देखील दिसत आहे. 'Don't Rush' या चॅलेंजवर त्यांनी या व्हिडीओमध्ये डान्स केला आहे.

हार्दिकनं या व्हिडीओत मुलगा अगस्त्यला उचलून घेतलं आहे. छोट्या पांड्यासोबतचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

नतानाशानं यापूर्वी देखील हार्दिक आणि अगस्त्यसोबतचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर केले आहेत. हार्दिकची पत्नी नताशा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. प्रकाश झा यांच्या 'सत्याग्रह' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बिग बॉस तसंच नच बलिए सारख्या रिएलिटी शो मध्ये देखील ती यापूर्वी सहभागी झाली आहे.

(वाचा : IND vs ENG : हार्दिकने मैदानात हात जोडून, जमिनीवर डोकं टेकून मागितली माफी )

हार्दिक आणि नताशा यांनी मागच्या वर्षी लग्न केलं होतं. त्यानंतर काही महिन्यामध्येच त्यांच्या आयुष्यात अगस्त्यचं आगमन झालं.

First published:

Tags: Hardik pandya, Instagram, Viral video.