मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'हार्दिक पांड्या म्हणजे क्रिकेटची 'कंगना रणौत' ते ट्विट होतय व्हायरल

'हार्दिक पांड्या म्हणजे क्रिकेटची 'कंगना रणौत' ते ट्विट होतय व्हायरल

Hardik Pandya

Hardik Pandya

हार्दिक पांड्या म्हणजे क्रिकेटची 'कंगना रणौत (Hardik Pandya Is Kangana Ranaut) असे ट्विट सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गेल्या दोन दिवसांपासून मुंबई विमानतळावर 5 कोटींची घड्याळं जप्त केल्याने चर्चेत आला आहे. त्याला या गोष्टीवरुनही ट्रोल करण्यात येत आहे. अशातच, अनेक युजर्सनी बी टाऊनची ड्रामा क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) हिच्याशी पांड्याची तुलना केली आहे. हार्दिक पांड्या म्हणजे क्रिकेटची 'कंगना रणौत असे ट्विट सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

खराब फॉर्ममुळे हार्दिक पांड्या याला टीम इंडियातून वगळण्यात आले. त्यानंतर आता मुंबई विमानतळावर त्याच्याकडून 5 कोटींची दोन घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. कस्टम विभागाने ही जप्तीची कारवाई केली आहे. नेहमी काही ना काही वादांमध्ये अडकणाऱ्या या पांड्याची तुलना युजर्सनी वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतसोबत केली आहे.

सध्या अनेक चाहते पांड्यावर भडकलेले आहेत आणि ते सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत. हा खेळाडू काय फक्त पैशांसाठीच क्रिकेट खेळतो? हा काय वर्ल्डकपमध्ये सुट्ट्यांसाठी गेला होता का? पांड्या टाइमपास आणि मॉडेलिंगसाठी क्रिकेट खेळत आहे का? असे प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत.

'माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जातीय' घड्याळांच्या जप्तीवर Hardik Pandyaचा खुलासा

यूएईमधून मुंबईत परतलेल्या हार्दिक पांड्या याला कस्टम विभागाने थांबवले आणि त्याच्याकडून दोन महागडी घड्याळे जप्त केली आहेत. या दोन घड्याळांची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे. हार्दिक पांड्या याने कस्टम विभागाला या घड्याळांची माहिती दिली नव्हती आणि त्या घड्याळांची बिल ही हार्दिक पांड्या याच्याकडे नव्हती अशी माहिती समोर आली आहे. यासर्वांवर पांड्याने ट्विट करत पांड्याने माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जातीय असे म्हटले आहे.

विमानतळावर उपस्थित असलेल्या कस्टम अधिकाऱ्यांना मी स्वतः सर्व सामानाची माहिती दिली आहे. तसेच, कस्टम विभागाने माझ्याकडे सर्व कागदपत्रे मागितली. सध्या ते योग्य कर्तव्याचे मूल्यमापन करण्यात गुंतले आहेत. मी पूर्ण शुल्क भरण्यास तयार आहे आणि सोशल मीडियावर घड्याळाची जी किंमत ५ कोटी सांगितली जात आहे, ती चुकीची आहे. या घड्याळाची किंमत दीड कोटी रुपये आहे. असे पांड्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

First published:

Tags: Cricket news, Hardik pandya, Kangana ranaut, Mumbai