Home /News /sport /

India New T20 Captain: भारतीय टी-20 संघाला मिळणार नवा कॅप्टन; सेहवागचा सल्ला BCCI ला पटला?

India New T20 Captain: भारतीय टी-20 संघाला मिळणार नवा कॅप्टन; सेहवागचा सल्ला BCCI ला पटला?

Photo-BCCI

Photo-BCCI

तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार झाल्यानंतर रोहितला अनेक मालिकांमध्ये खेळता आलेले नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तो टीम इंडियासोबत नव्हता. यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतही विश्रांती देण्यात आली होती.

    नवी दिल्ली, 28 जून : भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माच्या जागी आणखी एका खेळाडूकडे टी-20 संघाची कमान सोपवली जाऊ शकते. 35 वर्षीय रोहितवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार झाल्यानंतर रोहितला अनेक मालिकांमध्ये खेळता आलेले नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तो टीम इंडियासोबत नव्हता. यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतही विश्रांती देण्यात आली होती आणि आता तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातूनही बाहेर (India New T20 Captain) राहू शकतो. माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने भारतीय संघ व्यवस्थापनाला दिलेल्या सल्ल्यानुसार, रोहितला टी-20 च्या कर्णधारपदावरून आराम दिला जाऊ शकतो. यामुळे रोहितवरील कामाचा ताण कमी होईल आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल. त्याचे वय लक्षात घेऊन हे करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास हार्दिक पंड्याचे नाव आघाडीवर आहे, ऋषभ पंतला देखील संधी मिळू शकते. रोहित टी-20 मध्ये विश्रांती - सेहवाग म्हणाला की, एखाद्या दुसऱ्या खेळाडूला T20 चे कर्णधारपद मिळाल्यावर रोहित सहज ब्रेक घेऊ शकेल. यामुळे त्याला कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार करता येईल. मात्र, संघ व्यवस्थापन तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार ठेवण्याच्या आपल्या सध्याच्या धोरणावर ठाम राहिल्यास रोहित हाच एक आदर्श पर्याय आहे. संघ निवड समितीतील एका सदस्याने इनसाइड स्पोर्टसला सांगितले की, रोहित शर्माला लगेच टी-20 कर्णधारपदावरून पायउतार करण्याची गरज नाही. मात्र, त्याचावरील वर्कलोड कमी करण्यासाठी काही प्रयत्न करावी लागतील. त्यासाठी पर्याय म्हणून आपण हार्दिकचा विचार करत आहे. कारण, येत्या काही दिवसात संघाला बऱ्याच मालिका खेळायच्या आहेत. तसेच हार्दिक सध्या कसोटी संघातही खेळत नाही, त्याचा फायदा होईल. विराटच्या बाबतीत असे घडले नाही - दरम्यान, काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीच्या बाबतीत उलटा प्रकार घडला होता. कामाचा भार कमी करण्यासाठी त्याने टी-20 कर्णधारपद सोडले. यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून वनडेचे कर्णधारपदही काढून घेतले आणि एका महिन्यानंतर कोहलीने कसोटीचे कर्णधारपदही सोडले. कोहलीचे एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्यावर, बीसीसीआयने म्हटले होते की, निवडकर्त्यांना वनडे आणि टी-20 चा कर्णधार वेगळा असावा असे वाटत नाही, त्यामुळे रोहितला टी-20 चे कर्णधारपद सोडणे तसे कठीण होईल. हे वाचा - सरकारी नोकरी आणि सुविधा देणाऱ्या SBI मध्ये एका प्रयत्नात मिळेल जॉब; कसा ते वाचा या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी अनेक खेळाडूंना संधी दिली जात असून फायनल संघ शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विराट कोहली सध्या भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळत आहे. रोहित शर्मा आणि इशान किशन ही उजव्या आणि डाव्या हाताची जोडी सुपरहिट ठरू शकते आणि टी-20 विश्वचषकासाठी ईशान-राहुलची जोडी खूपच मनोरंजक ठरू शकते, असे सेहवागचे म्हणणे आहे. हे वाचा - आता सुपरफास्ट वेगानं तुम्हाला मिळेल रेल्वेत जॉब; 'या' IMP टिप्स ठरतील वरदान सेहवागने युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे विशेष कौतुक केले. उमरानला मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहसह विश्वचषक संघात सामील करावे. सध्या उमरान मलिकला सेहवागने सर्वाधिक पसंती दिली आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या प्रमुख गोलंदाजांसह त्याला निश्चितपणे संधी दिली पाहिजे असे त्याचे म्हणणे आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Cricket news

    पुढील बातम्या