सर्बियन मॉडेलच्या प्रेमात पडला टीम इंडियाचा स्टार खेळाडू, सोशल मीडियावर दिली कबुली!

सर्बियन मॉडेलच्या प्रेमात पडला टीम इंडियाचा स्टार खेळाडू, सोशल मीडियावर दिली कबुली!

भारतीय संघातील खेळाडूंच्या अफेअरच्या चर्चा या सोशल मीडियावर नेहमीच होत असतात.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : भारतीय संघातील खेळाडूंच्या अफेअरच्या चर्चा या सोशल मीडियावर नेहमीच होत असतात. या ब्रेकअप, पॅचअप, घटस्फोट या गोष्टी नेहमीच होत असतात. आता आणखी खेळाडूच्या अशा चर्चा सोशल मीडियावर सतत होत असतात. यातच बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे संबंध नेहमीच प्रेमाचे असतात, मग यात अनुष्का-विराट यांची जोडी असो किंवा जहीर आणि सागरिका घाटगे असो. बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेकपटू यांचे नेहमीच जवळचे संबंध राहिले आहेत. आता एका सर्बियन मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्रीच्या प्रेमात भारतीय संघाचा एक स्टार खेळाडू बुडाला आहे. यांच्यातील गोष्टी एवढ्या पुढ्या गेल्या की एकमेकांच्या कुटुंबीयांनीही भेट घेतली.

भारतीय संघ सध्या पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपची तयारी करत आहेत. यात भारताचा स्टार खेळाडू सध्या सरावात नाही तर प्रेमात व्यस्त आहे. ही सर्बियन मॉडेल आहे, नताशा स्टॅन्कोविक. नताशा मुळची सर्बियाची आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून तिने डान्स शिकायला सुरवात केली. नच बलिए 9 मध्ये तिने सहभाग घेतला होता. एवढेच नाही तर बॉलिवडूमध्ये नताशानं एन्ट्री केली ती ‘डॅडी’ या चित्रपटात एका आयटम साँगवर थिरकत. तिच्या याच अदांवर घायाळ झाला आहे, टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या.

 

View this post on Instagram

 

✨✨✨

A post shared by 🎀Nataša Stanković🎀 (@natasastankovic__) on

वाचा-क्रिकेटपटूनं शेअर केला अर्धनग्न फोटो, सोशल मीडियावर झाला ट्रोल

भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्यानं आपल्या एका सोशल मीडियावर पोस्टवर आपल्या प्रेमाची कबुलीही दिली आहे. एवढेच नाही तर नव्या गर्लफ्रेंडविषयी हार्दिक गंभीर असून त्यानं नताशाची कुटुंबीयांसोबत भेटही घडवून आणली. त्यामुळं सध्या हार्दिक पांड्या या नव्या नात्याबाबत खुश आहे. याआधी हार्दिक पांड्याचे नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. रविवारी इन्स्टाग्रामवर पांड्यानं इन लव्ह अशी पोस्ट केली होती. यावर नताशानं तशीच प्रतिक्रिया दिली.

 

View this post on Instagram

 

🇮🇳❤️

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

वाचा-KBC मध्ये ‘हा’ प्रश्न का नाही विचारत? गावसकर यांनी घेतली बिग बींची फिरकी

याआधी हार्दिक पांड्याचे नाव इशा गुप्ता, अॅली अव्हराम आणि उर्वशी रौतेलाशी जोडले गेले होते. त्यानंतर कॉफी विथ करण या कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्याच्याशी अनेक महिलांनी बोलणे टाळले होते. मात्र आता पुन्हा एकदा हार्दिक पांड्या प्रेमात पडला आहे. यावेळी गोष्टी मात्र जास्तच पुढे गेल्या आहेत. पांड्यानं आपल्या कुटुंबीयांना नताशाची ओळख करून दिली आहे, त्यामुळं लवकरच पांड्या विवाहबंधनात अडकू शकतो.

वाचा-गर्लफ्रेंडसोबत SEX हा माझ्या आयुष्यातला बेस्ट गोल! फुटबॉलपटूचे धक्कादायक वक्तव्य

स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2019 06:21 PM IST

ताज्या बातम्या