• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • हार्दिक पांड्याच्या वादग्रस्त विधानावर मोठ्या भावानं दिली प्रतिक्रिया

हार्दिक पांड्याच्या वादग्रस्त विधानावर मोठ्या भावानं दिली प्रतिक्रिया

कॉफी विथ करण वादानंतर हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं बंदीची कारवाई केली होती.

 • Share this:
  त्रिनिदाद, 14 ऑगस्ट : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला गेल्या वर्षी एका टीव्ही शोमध्ये वादग्रस्त विधानामुळं काही काळ क्रिकेटपासून लांब रहावं लागलं होतं. त्याबद्दल हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पांड्यानं प्रतिक्रिया दिली आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टी20 संघात कृणाल पांड्याची निवड झाली आहे. त्याचा लहान भाऊ हार्दिक पांड्यानं कॉफी विथ करण वाद आता मागे टाकला असून त्याचं संपूर्ण लक्ष क्रिकेटवर आहे आहे. हार्दिक पांड्यासोबत केएल राहुलसुद्धा या वादात अडकला होता. बीसीसीआयनं दोघांवर बंदीची कारवाई केली होती. त्यानंतर दोघांनीही वर्ल्ड कपमधून पुनरागमन केलं. कृणाल पांड्या म्हणाला की, माणसाकडून चुका होतात. शेवटी आपण माणूस आहे पण हार्दिकनं त्याची चूक स्वीकारली हीच त्याची ताकद आहे. त्यानं आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. काही लोक तर सत्याकडं दुर्लक्ष करतात. हार्दिकनं तसं केलं नाही. तो चुकांमधून शिकला आणि पुनरागमन केलं. हार्दीक पांड्यासोबत केल्या जाणाऱ्या तुलनेबद्दल कृणाल पांड्या म्हणाला की, तो स्वत: याबद्दल कधी विचार करत नाही. दोघांचं लक्ष्य एकच आहे ते म्हणजे आपल्या देशाचं नाव मोठं करण्यासाठी योगदान देणं. कृणाल पांड्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर टी20 संघात होता. भारतानं टी20 मालिका 3-0 ने जिंकली आहे. हार्दिक पांड्याला वेस्ट इंडीज दौऱ्यातून आराम देण्यात आला आहे. विंडीज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात खेळण्यासाठी येणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची मालिका होणार आहे. असं धाडस करू नका, तलावात उडी मारणे तरुणाला पडले महागात, पाहा हा VIDEO
  Published by:Suraj Yadav
  First published: