एक झलक पाहण्यासाठी आलेल्या चाहत्याचा गंभीर अपघात, मदतीसाठी धावून आला पांड्या

एक झलक पाहण्यासाठी आलेल्या चाहत्याचा गंभीर अपघात, मदतीसाठी धावून आला पांड्या

अपघात झालेल्या चाहत्याच्या मदतीसाठी धावून आला हार्दिक पांड्या.

  • Share this:

चेन्नई, 26 सप्टेंबर : भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात आपल्या आवडत्या खेळाडूंना चिअर करण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. यात क्रिकेटपटूंचे जबरे फॅन काही कमी नाहीत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा चाहता सुधीर गौतमनं आपलं सारं आयुष्य क्रिकेटला वाहिलं. याच यादीत आता नोंद झाली आहे ती मुगुंथन यांची. मुगुंथन हा भारताचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या याचा चाहता आहे.

मुंगुंथननं हार्दिक पांड्या खेळत असलेले सर्व सामने पाहिले आहेत. भारताचा पहिला टी-20 सामना पाहण्यासाठी धर्मशाला येथे जात असताना मुंगुंथननचा अपघात झाला. जवळपास 3 हजार किमीचे अंतर रस्त्यामागे गाठण्याचा निर्धार मुंगुंथननं केला होता. मात्र रस्त्यातच त्याचा अपघात झाला. त्याला त्वरितच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळं त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. म्हणून डॉक्टरांनी त्वरित सर्जरी करण्याचा सल्ला दिला.

हार्दिक पांड्याचा मुगुंथन एवढा मोठा चाहता आहे की, त्यानं आपल्या शरीरावर 16 विविध भाषांमध्ये त्यानं हार्दिकचे नाव गोंदवून घेतले आहे. एवढेच नाही तर कॉफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिकनं केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. हार्दिकनं पुन्हा क्रिकेट खेळावे यासाठी मुगुंथननं देवाकडे साकडेही घातले होते. हार्दिकची हेअरस्टाईलही त्यानं कॉपी केली होती.

वाचा-मी काय तबला वाजवण्यासाठी आहे का? टीकाकारांवर रवी शास्त्री भडकले

वाचा-प्लीज मला ओपनिंगला पाठवा, सचिननं सांगितली 25 वर्षांपूर्वीची UNTOLD STORY

दरम्यान आपल्या जबऱ्या चाहत्याला झालेली दुखापतीची बातमी ऐकून त्याला रहावले नाही. अस्वस्थ झालेल्या हार्दिकनं त्वरिक मुगुंथनच्या उपचाराचा सर्व खर्चाचा भार उचलला. उपचारानंतर मुंगुंथननं आपल्या घरी कोईम्बतूरला पुन्हा परतला आहे.

वाचा-लिलावाची तारीख ठरली, मात्र टी-20 वर्ल्ड कपमुळं वेळापत्रकात होणार बदल

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

First published: September 26, 2019, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading