Live Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018 : हार्दिक पांड्याला दुखापत, काय घडलं नेमकं मैदानावर ?

Live Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018 : हार्दिक पांड्याला दुखापत, काय घडलं नेमकं मैदानावर ?

  • Share this:

दुबई, 19 सप्टेंबर : भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ आशिया कप मालिकेच्या निमित्तानं एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पाकिस्तानने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय मात्र पाकसाठी घातक ठरला. कारण भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानची ओपनिंग जोडी चौथ्या ओव्हरमध्ये फोडून काढली. इमाम उल हक 2 धावा तर फखर जमान 0 धावावर बाद झाला. टीम पाकिस्तानची सावध खेळी सुरू आहे तर भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा सुरूच आहे.

अशाच टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे सामना अर्धवट सोडावा लागला. पाचवी ओव्हर टाकत असताना अचानक पाठीत चमक निघाल्यामुळे भर मैदानात पांड्या जमिनीवर कोसळला. डाॅक्टरांची टीम मैदानात येऊन तपासणी केली आणि त्याला स्ट्रेचरवर घेऊन गेली. पांड्या मैदानातून बाहेर गेल्यामुळे टीम इंडियावर याचा परिणाम झालाय. त्याच्या जागी मनिष पांड्याला बोलवण्यात आलंय. या हाय-व्होल्टेज सामन्याकडे फक्त भारत आणि पाकिस्तानचं नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय. कारण जवळपास एका वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना होतोय. दुबईतल्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे.

Asia Cup 2018 : रोहित कर्णधार बनताच, भुवनेश्वरचे नशीब फळफळले

एशिया कप स्पर्धे मंगळवारी हॉकाँगविरूद्धचा पहिला सामना भारताने जिंकल्यानंतर पाकिस्तानविरूद्धचा दुसरा सामना दुबईत सुरू झालाय. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मॅचच्या तीसऱ्याच ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने भारतासाठी पहिला बळी घेतला. तीसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलमध्ये त्याने इमाम उल हकला २ धावांवरच माघारी पाठवलं.

एक दिवसीय सामन्यात भुवनेश्वरने तब्बल 35.3 ओव्हरनंतर ही व्हिकेट घेतलीय. त्यामध्ये त्याने 212 धावा दिल्या आहेत.

त्यानंतर लगेच पाचव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलमध्ये त्याने दुसरा बळी घेतला. त्यामुळे फखार झामनला आपलं खातंसुद्धा उघडता आलं नाही.

2018 मध्ये भुवनेश्वरने एकून 49 ओव्हर टाकल्या आणि त्यामध्ये त्याने फक्त २ बळी घेतले. या दोन व्हिकेट्स बऱ्याच काळानंतर भुवनेश्वरचा फॉर्म परत आल्याचं दिसून आलं. रोहित कर्णधार बनताच भुवनेश्वरचे नशीब फळफळंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2018 07:12 PM IST

ताज्या बातम्या