मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : अनफिट Hardik Pandya कधी करणार बॉलिंग? ऑलराऊंडरने स्वत:च दिलं उत्तर

IPL 2021 : अनफिट Hardik Pandya कधी करणार बॉलिंग? ऑलराऊंडरने स्वत:च दिलं उत्तर

आयपीएलचे (IPL2021) दुसरे पर्व सुरु झाल्यापासुन मॅचेसमध्ये मुंबईच्या फॅन्सना हार्दिक पंड्याची (Hardik Pandya missing) उणीव चांगलीच जाणवली. पंड्या कुठे आहे आणि पुढच्या मॅचमध्ये तरी तो खेळेल का, हा प्रश्न फॅन्सना (MI Fans) पडला असतानाच पांड्या चाहत्यांसाठी खुशखबर घेऊन आला आहे. आएगा जल्दी, कोशीश पूरी है!(I will bowl soon. Efforts are on) असे पांड्याने एका मुलाखतीत म्हटले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: आयपीएल 2021 चे (IPL2021) दुसरे पर्व सुरु झाल्यापासून मुंबईच्या फॅन्सना हार्दिक पांड्याची (Hardik Pandya missing) उणीव चांगलीच जाणवली. पांड्या कुठे आहे आणि पुढच्या मॅचमध्ये तरी तो खेळेल का, हा प्रश्न फॅन्सना (MI Fans) पडला असतानाच पांड्या चाहत्यांसाठी खुशखबर घेऊन आला आहे. आएगा जल्दी, कोशीश पूरी है!(I will bowl soon. Efforts are on) असे पांड्याने एका मुलाखतीत म्हटले आहे.

आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya in IPL 2021) फिटनेस सातत्याने चर्चेत आहे. नुकतचं, मुंबई इंडियन्सचे कोच माहेला जयवर्धने यांनी आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला बॉलिंग करण्यास बाध्य करता येणार नाही. असे झाल्यास त्याला त्रास होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष पांड्याच्या प्रतिक्रियेकडे वळले होते.

हे वाचा- T20 World Cup साठी निवड झालेले भारतीय खेळाडू फ्लॉप, 'स्टॅण्डबाय'नी केला धमाका!

घेण्यात आलेल्या एका स्पोर्टस न्युजच्या मुलाखतीत पांड्या म्हणाला, धावा होणे महत्त्वाचे आहे आणि विशेष करून जेव्हा तुमचा संघ जिंकतो. शिवाय माझा आत्मविश्वास उंचावण्यासाठीही ते गरजेचे आहे, परंतु त्या धावा संघासाठीही अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. गोलंदाजीबद्दल विचारले असता. पांड्या म्हणाला 'आएगा जल्दी, कोशीश पूरी है!

हे वाचा- 22 वर्षांच्या फास्ट बॉलरचा सेहवाग झाला फॅन, सांगितलं टीम इंडियाचं 'भविष्य'

पांड्याच्या या एका वाक्यामुळे त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. तसेच, अनफिट पांड्याला आयसीसी वर्ल्ड कप (Hardik Pandya To Be Dropped From India’s T20 World Cup Squad) संघातून डच्चू देतात की काय, अशा रंगतलेल्या चर्चांदेखील पुर्णविराम मिळाला आहे. हार्दिकला काही त्रास जाणवत असल्यामुळे, खबरदारी म्हणून त्याला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या मॅचमध्ये आराम दिला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यावेळीही हार्दिकला बाहेरच बसवण्यात आलं होतं. बॉलिंग कोच शेन बॉण्ड यांनीही या निर्णयाला दुजोरा दिला होता.

First published:

Tags: Hardik pandya, IPL 2021, Mumbai Indians