मुंबई, 07 एप्रिल : मुंबई इंडियन्स संघाचा ऑलराऊंडर आणि धडाकेबाद फलंदाज नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतो. कधी त्याच्या कपड्यांवरुन तर कधी त्याच्या वक्तव्यामुळं. हार्दिक आता चर्चेत आला आहे तो, त्यानं स्वत:ला एक शानदार गाडी गिफ्ट केली आहे. पांड्यांन नुकतीच मर्सिडीज-AMG G63 SUV गाडी घेतली आहे. या गाडीची किंमत आहे 2.19 कोटी. दरम्यान हार्दिकनं आपल्या गाडीसोबतचा फोटो शेअर केलेला नाही. तरी, त्याच्या गाडीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या याची बायको पंकुडी शर्मा हीनं टाकला आहे.
काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्यानं ही SUV स्वत:ला गिफ्ट केली. दरम्यान मागच्या वर्षीच पांड्यानं Audi A6 35TDI सुडान गाडी घेतली होती. A6 सुडान ही सुडानची सर्वात महागडी आणि बहुचर्चित गाडी आहे. A6 सुडान या गाडीची किंमत 65 लाख होती, आता हार्दिकनं घेतलेल्या गाडीची किंमत 2.19 कोटी आहे. मर्सिडीज-AMG G63 SUV ही गाडी मर्सिडीजनं ऑक्टोबर 2018ला लॉंच केली होती. या गाडीच्या आत पॅलेडियम सिल्वर मेटॅलिक रंग दिलेला आहे. ज्याचा लुक खुप चांगला असून हार्दिकची ही सर्वात महागडी गाडी आहे.
VIDEO: चड्डी-बनियान गँगचा पेट्रोल पंपावर दरोडा; दरोडेखोर CCTV कॅमेऱ्यात कैद