मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार का? BCCI ने दिली मोठी Update

हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार का? BCCI ने दिली मोठी Update

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून (India vs New Zealand T20 Series) डच्चू मिळाल्यानंतर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya Fitness) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यावरूनही संशय निर्माण झाला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 21 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून (India vs New Zealand T20 Series) डच्चू मिळाल्यानंतर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya Fitness) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यावरूनही संशय निर्माण झाला आहे. हार्दिक पांड्याने ब्रेकनंतर नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये (NCA) जावं आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी आपला फिटनेस सिद्ध करावा, असं बीसीसीआय (BCCI) आणि निवड समितीला वाटत आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सशी बोलताना ही माहिती दिली. हार्दिक पांड्याची रिकव्हरी आरामावरही अवलंबून आहे. तो लवकरच बँगलोरच्या एनसीएमध्ये जाईल. आम्ही फिटनेसच्या आधारावरच त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड करायची का नाही ते ठरवू, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.

फिटनेसने त्रस्त असलेला हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपच्या सगळ्या मॅच खेळला, पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. सुपर-12 मध्येच टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं. हार्दिकचा खराब फिटनेसही भारताच्या खराब कामगिरीचं प्रमुख कारण ठरलं. या कारणामुळे हार्दिकची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठीही टीम इंडियात निवड झाली नाही.

हार्दिक मागच्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे, या कारणामुळे त्याला 6 महिने मैदानाबाहेर राहावं लागलं. बॉलिंग केल्यामुळे त्याची दुखापत पुन्हा वाढण्याची भीती आहे, त्यामुळे त्याला बॉलिंग न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, म्हणून तो आयपीएलमध्येही बॉलिंग करताना दिसला नाही. टी-20 वर्ल्ड कपच्या काही सामन्यांमध्ये हार्दिकने बॉलिंग केली, पण दुखापतीचा असर त्याच्या बॉलिंगमध्ये दिसत होता. दुखापतीमुळे हार्दिकला विजय हजारे ट्रॉफीमध्येही न खेळण्याचा सल्ला देण्यात आला आहे, पण याबाबतचा अंतिम निर्णय हार्दिकलाच घ्यायचा आहे.

स्थानिक क्रिकेट खेळण्यापेक्षा त्याने स्वत:ला फिट ठेवावं, पण खेळायचं का नाही याचा निर्णय हार्दिकनेच घ्यावा. टेस्ट क्रिकेटसाठी गरजेचा असलेल्या फिटनेसच्या जवळही हार्दिक नाही. त्याला आणखी वेळेची गरज आहे, आम्ही वर्ल्ड कपवेळी केली तशी घाई करणार नाही. जर तो तयार असेल तर त्याला वनडे आणि टी-20 सीरिजसाठी पाठवलं जाईल, असं वक्तव्य बीसीसीआय अधिकाऱ्याने केलं.

बीसीसीआयचे काही अधिकारी, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि टीम इंडियाचं प्रशासन अजूनही हार्दिक पांड्याला सध्याचा सर्वोत्तम ऑलराऊंडर मानतंय. त्यामुळे हार्दिकने एनसीएमध्ये आपली रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन पूर्ण करावं. जर तो फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तर त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाठवलं जाईल. सध्या टेस्ट टीमसाठी त्याचा विचार केला जाणार नाही, असं बीसीसीआय अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

First published: