मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Hardik Pandya : आता ऑस्ट्रेलियाच काही खरं नाही! हार्दिक पांड्याने वनडे मालिकेआधी खरेदी केलं नवीन अस्त्र

Hardik Pandya : आता ऑस्ट्रेलियाच काही खरं नाही! हार्दिक पांड्याने वनडे मालिकेआधी खरेदी केलं नवीन अस्त्र

आता ऑस्ट्रेलियाच काही खरं नाही! हार्दिक पांड्याने वनडे मालिकेआधी खरेदी केलं नवीन अस्त्र

आता ऑस्ट्रेलियाच काही खरं नाही! हार्दिक पांड्याने वनडे मालिकेआधी खरेदी केलं नवीन अस्त्र

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 मार्च पासून वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार हार्दिक पांड्याने नवीन बॅटची खरेदी केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 14 मार्च : सोमवारी भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत विजय मिळवला. या विजयासह भारताने सलग चारवेळा ऑस्ट्रेलियाला कसोटी क्रिकेटमध्ये हरवण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आता 17 मार्च पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व भारताचा अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या करणार आहे. तेव्हा या मालिकेपूर्वी कर्णधार हार्दिक पांड्याने नवीन बॅटची खरेदी केली आहे.

हार्दिक पांड्या हा बॉर्डर गावस्कर मालिकेचा भाग नव्हता. तेव्हा या दिवसात त्याने आपल्या कुटूंबासोबत बराच वेळ घालवला. त्यानंतर आता त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेची तयारी सुरू केली आहे. वनडे मालिकेपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हार्दिक पांड्या स्वतःसाठी बॅट तयार करण्यासाठी एका बॅटच्या कारखान्यात गेला. या व्हिडिओमध्ये त्याचा भाऊ कृणाल पांड्या देखील दिसत आहे. त्याच्यानुसार नवीन बॅट तयार केल्यानंतर हार्दिकने या नवीन बॅटने काही फटके देखील मारले.

हार्दिकने स्वतः हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हार्दिक पांड्या हा एसजी सवेज एक्सट्रीम कंपनीच्या बॅट वापरतो. हार्दिक पांड्या ज्या बॅट वापरतो त्याची किंमत 5 हजार पासून ते लाख रुपयांपर्यंत असते.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, Hardik pandya, India vs Australia