मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'माझी टीम इंडियात निवड करू नका', हार्दिक पांड्याचा निवड समितीला मेसेज!

'माझी टीम इंडियात निवड करू नका', हार्दिक पांड्याचा निवड समितीला मेसेज!

भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) त्याच्या फिटनेसवर पूर्ण लक्ष द्यायचं आहे, याच कारणामुळे त्याने निवड समितीला आपला टीम इंडियातल्या निवडीसाठी काही काळ विचार केला जाऊ नये, असं सांगितलं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 28 नोव्हेंबर : भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) त्याच्या फिटनेसवर पूर्ण लक्ष द्यायचं आहे, याच कारणामुळे त्याने निवड समितीला आपला टीम इंडियातल्या निवडीसाठी काही काळ विचार केला जाऊ नये, असं सांगितलं आहे. 2019 साली झालेल्या पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पांड्याला भारत आणि आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) बॉलिंग करता येत नाहीये. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिक पांड्याचं लक्ष्य बॉलिंगमध्ये पुनरागमन करण्यावर आहे, यासाठी त्याने निवड समितीकडे वेळ मागितली आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) हार्दिक पांड्या भारतीय टीममध्ये होता, पण 5 पैकी फक्त 2 सामन्यांमध्येच हार्दिकने बॉलिंग केली होती, यातल्या एकाही सामन्यात त्याला विकेट मिळाली नव्हती.

टी-20 वर्ल्ड कपआधी आयपीएलमध्येही पांड्याच्या बॉलिंग फिटनेसवर अनेकांची नजर होती, पण त्याने आयपीएलच्या एकाही मॅचमध्ये बॉलिंग केली नाही. पांड्याने आयपीएलमध्ये शेवटची बॉलिंग 2019 साली केली होती, 2020 साली तो बॅटर म्हणून खेळला होता. फिटनेसच्या समस्येमुळे हार्दिकची न्यूझीलंडविरुद्धच्या 3 टी-20 मॅचच्या सीरिजमध्येही निवड झाली नव्हती. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही त्याला संधी दिली जाणार नसल्याचं सांगितलं जातंय.

भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनीही हार्दिक पांड्यावर निशाणा साधला होता. हार्दिक पांड्या तेवढी बॉलिंग करत नाही, मग त्याला ऑलराऊंडर कसं म्हणायचं? ऑलराऊंडर असणाऱ्याला दोन्ही कामं करावी लागतात. तो दुखापतीतून बाहेर येत आहे, त्यामुळे पहिले त्याला बॉलिंग करू दे, असं कपिल देव म्हणाले होते.

First published:

Tags: Hardik pandya, Team india