मुंबई, 01 डिसेंबर : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा स्टानकोविच यांच्या नात्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती. अखेर हार्दिक पांड्याने सर्व अफवा आणि चर्चा थांबवत नातं जाहीर केलं आहे. नव्या वर्षाच्या आधी हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर नताशासोबत एक फोटो शेअर केला आहे.
पांड्याने शेअर केलेल्या फोटोसोबत एक कॅप्शन दिला आहे. त्यात म्हटलं की, नव्या वर्षाची सुरुवात माझ्या 'फायरवर्क'सोबत. यासोबत त्याने लव्हचा इमोजीसुद्धा शेअर केला आहे. त्याच्या या फोटोवर भारताच्या क्रिकेटपटूंसह पांड्याच्या मित्र-मैत्रीणींनी कमेंट केल्या आहेत.

सोशल मीडियावर पांड्या आणि नताशा यांच्या अफेअरची चर्चा गेल्या काही महिन्यांत सुरू झाली होती. अनेकदा त्यांना एकत्र पाहण्यात आलं होतं. नताशा हार्दिक पांड्याच्या कुटुंबियांनाही भेटली असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांपैकी आतापर्यंत कोणीही यावर स्पष्ट मत व्यक्त केलं नव्हतं. मात्र पांड्याच्या या फोटोने आता दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
विराट शूट करत होता Happy New Year चा VIDEO आणि अनुष्काने मधेच...
पांड्याच्या वाढदिवसाला नताशाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. नताशाचे याआधी अभिनेता अली गोनीसोबत अफेअर होते. तिने नच बलिएमध्ये भाग घेतला होता. हार्दिक पांड्याचे नाव याआधी ईशा गुप्ता, उर्वशी रौतेला आणि एली अवरामसोबत जोडलं गेलं होतं पण त्यांच्यासोबतचा फोटो पांड्याने कधीही शेअर केला नव्हता.
साक्षीने शेअर केला धोनीसोबतचा फोटो, चाहत्यांना दिल्या New Year च्या शुभेच्छा मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.