Home /News /sport /

साखरपुड्यानंतर हार्दिक-नताशाचा रोमान्स सुरू, शेअर केला Romantic फोटो

साखरपुड्यानंतर हार्दिक-नताशाचा रोमान्स सुरू, शेअर केला Romantic फोटो

भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं.

  मुंबई, 07 जानेवारी : भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. हार्दिक पांड्यानं दुबईमध्ये क्रुझवर शानदार पध्दतीनं नताशाला प्रपोज केले. हार्दिक आणि नताशा स्टान्कोविच (Hardik Pandya and Natasa Stankovic Engagement) यांचा साखरपुडा सर्वांनाच धक्का देणारा होता. हार्दिक आणि नताशा यांनी 1 जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर साखरपुडा झाला असल्याचे जाहीर केले. साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच आता नताशा आणि हार्दिक यांचा एक रोमांटिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हार्दिक पांड्या आणि नताशा एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. नताशाने आपल्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.
   
  View this post on Instagram
   

  Forever yes ❤️ @hardikpandya93

  A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

  नव्या वर्षाच्या आधी हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर नताशासोबत एक फोटो शेअर केला होता. पण 1 तारखेला संध्याकाळी त्याने आणखी काही फोटो शेअर करत आपली कमिटमेंट सिद्ध केली. Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. 01.01.2020 ❤️ #engaged असं लिहित त्यानं फोटो शेअर केले होते. नताशा सर्बियन मॉडेल असून बिग बॉस या रिअलिटी शोमध्येही तिनं काम केले आहे. रॅपर बादशाहसोबत एका गाण्यात दिसली होती. नताशाने काही बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले आहे.
   
  View this post on Instagram
   

  A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

  तर, दुसरीकडे हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळं क्रिकेट खेळू शकत नाही आहे. त्यामुळं बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंका दौऱ्यात त्याला संधी मिळालेली नाही. हार्दिकनं शेवटचा टी-20 सामना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 2019मध्ये खेळला होता.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Cricket, Hardik pandya

  पुढील बातम्या