छोटा पांड्या आला; लॉकडाऊनमध्ये हार्दिक-नताशाने दिली GOOD NEWS

छोटा पांड्या आला; लॉकडाऊनमध्ये हार्दिक-नताशाने दिली GOOD NEWS

हार्दिक पांड्याने आपल्या चिमुकल्या बाळाचा फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या (hardik pandya) घरी आता छोटा पांड्या आला आहे. हार्दिक आणि नताशाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. हार्दिक आणि नताशाला मुलगा झाला आहे. हार्दिकने सोशल मीडियावर ही गूड न्यूज दिली आहे.

हार्दिक आणि नताशाचा यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. दोघंही आता आई-बाबा झाले आहेत. हार्दिकने आपल्या चाहत्यांसह आपला आनंद शेअर केला आहे. आपल्या बाळाचा चिमुकला हात आपल्या हातात घेत हार्दिकने फोटो काढला आहे आणि ट्विटरवर पोस्ट केला आहे.

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकने जानेवारीत साखरपुडा केला होता. हार्दिक पांड्या आणि नताशाने सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याची रोमँटिक छायाचित्रे शेअर केली होती आणि दोघांनीही एकमेकांना डेट केल्याची माहिती दिली होती. या दोघांच्या साखरपुड्याचा व्हिडीओ आणि फोटोंबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती. लॉकडाऊनमध्येही दोघं एकत्रच राहत होते.

हे वाचा - IPL 2020 वेळापत्रकात झाला मोठा बदल, आता ‘या’ तारखांना होणार सामने

काही महिन्यांतच आपण दोघंही आई-बाबा होणार असल्याचं सांगत हार्दिकने सर्वांना आश्चर्यचिकत केलं होतं. आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याचं त्याने सोशल मीडियावर सांगितलं. त्या दोघांनीही आयुष्याच्या नवा प्रवासाला सुरुवात केली होती. यानंतर आपल्या या अनमोल क्षणाचे फोटो दोघंही सोशल मीडियावर शेअर करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मॅटर्निटी फोटोशूट केलं होतं. त्याआधी बेबी शॉवरचे फोटोही शेअर केले होते. याशिवाय फॅमिली फोटोही पोस्ट केला होता.

हे वाचा - युएईमध्ये बदलणार विराटचं नशीब? ‘हे’ 3 खेळाडू पहिल्यांदाच संघाला करणार चॅम्पियन

हे फोटो शेअर करताना ते ज्या क्षणाची वाट पाहत होते. तो क्षण अखेर आला. त्यांच्या कुटुंबात नवा पाहुणा आला आहे. क्युट कपलची क्युट अशी फॅमिली आता पूर्ण झाली आहे.

Published by: Priya Lad
First published: July 30, 2020, 4:22 PM IST

ताज्या बातम्या