मुंबई, 14 फेब्रुवारी : क्रिकेटर हार्दिक पांड्याने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नताशा स्टॅनकोविचसोबत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली. टीम इंडिया टी-20 आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने 2020 मध्ये सर्बियाच्या नताशा स्टॅनकोविचसोबत कोर्ट मॅरेज केले होते. लग्नानंतर या जोडप्याला अगस्त्य नावाचा मुलगा झाला. हार्दिक आणि नताशाने यावर्षी व्हॅलेंटाइन डेला उदयपूरमध्ये एका रोमँटिक सेरेमनीमध्ये पुन्हा लग्न केलं. उदयपूरमधील उदय सागर तलावाच्या मध्यभागी असलेल्या हॉटेल रॅफल्समध्ये ख्रिश्चन परंपरेनुसार त्यांचे लग्न झाले. हिंदू परंपरेनुसार बुधवारी लग्न होणार असून त्यात ते सात फेरे घेणार आहेत.
We celebrated Valentine’s Day on this island of love by renewing the vows we took three years ago. We are truly blessed to have our family and friends with us to celebrate our love ❤️ pic.twitter.com/tJAGGqnoN1
— hardik pandya (@hardikpandya7) February 14, 2023
दिग्गज सेलिब्रिटींची हजेरी
मंगळवारी शाही लग्नाच्या पहिल्या दिवशी क्रिकेटर दिनेश कार्तिक, अभिनेता जय भानुशाली आणि उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस याशिवाय माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, अजय जडेजा आणि महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी, केजीएफ चित्रपट अभिनेता यश यांनीही हजेरी लावली. मंगळवारी आयोजित केलेल्या व्हाइट वेडिग थीमसाठी दिल्लीसह अन्य ठिकाणांहून फुले आणण्यात आली होती.
वाचा - Women IPL : Girls are not allowed पुण्याच्या देविकाने त्या सर्वांना चुकीचं ठरवलं
पांढरी सजावट
पांढरी शुभ्र सजावट आणि पांढर्या रंगाची फुले व डिशेससह लग्नाला उपस्थित असलेले बहुतेक पाहुणे देखील पांढर्या शुभ्र वेशभूषेत लग्नाला उपस्थित होते. नताशाही पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. संध्याकाळी उशिरा आलेल्या पाहुण्यांमध्ये क्रिकेट समालोचक जतिन सप्रू आणि ईशान किशन यांचा समावेश होता, ज्यांनी हॉटेलचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी 2020 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. दोघेही सोमवारी मुलासह मुंबईहून उदयपूरला पोहोचले होते. लवकरच ते हिंदू परंपरेनुसार विवाह करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Hardik pandya