भारतीय क्रिकेटपटूची पत्नी लग्नाआधीच करायची करवा चौथ

भारतीय क्रिकेटपटूची पत्नी लग्नाआधीच करायची करवा चौथ

विवाहित स्त्रियांसाठी करवा चौथ हा सण खूप खास असतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केलं जातं.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर : करवा चौथ हा सण सर्व विवाहित स्त्रियांसाठी खूप खास असतो. लग्नानंतर सुवासिनी हा सण साजरा करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचं व्रत केलं जातं. फक्त लग्न झालेल्या महिलाच नाही तर अविवाहीत मुलीदेखील हे व्रत करतात. असं मानतात की जर विधिवत व्रत केलं तर मनासारखा जोडीदार मिळतो. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या पत्नीने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपणही लहानपणापासून करवा चौथ व्रत करत असल्याचं सांगितलं. हरभजनची पत्नी गीता बासरा ही बॉलीवूड अभिनेत्री आहे.

मुलाखतीत गीता बासराने सांगितलं की, लहानपणापासून तिला हा सण आवडतो. जेव्हा जेव्हा टीव्हीवर अभिनेत्री किंवा घरी आई हे व्रत करायची ते पाहताना आपल्यालाही ते व्रत करण्याची इच्छा व्हायची. म्हणूनच लग्नाच्या आधीदेखील करवा चौथचं व्रत करत होते.

View this post on Instagram

My be all and end all... ❤️

A post shared by Geeta Basra (@geetabasra) on

हरभजन सिंग आणि गीता यांचं लग्न 29 ऑक्टोबर 2015 ला झालं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी करवा चौथ होतं. त्याबद्दल आपण खूपच उत्सूक होतो असं गीताने सांगितलं. या सणासाठी आम्ही रात्रभर तयारी करत होतो. त्यावेळ मला पहिली सर्गी खास होती. आम्ही सोबत पूजा केली. यासाठी आतापर्यंतचा तो सण माझा स्पेशल आहे असंही गीता म्हणाली.

View this post on Instagram

🌸💗🌸

A post shared by Geeta Basra (@geetabasra) on

गीताने हरभजनशी झालेल्या भेटीबद्दल सांगितलं की, हरभजनने तिच्या चित्रपटाचं पोस्टर पाहिलं होतं. त्यात गीता त्याला आवडली. त्यानंतर हरभजनने त्याच्या सहकाऱ्याला तिच्याबद्दल विचारलं. दोघांमध्ये मैत्री झाली आणि प्रेमही झालं. दोघांना एक मुलगी आहे. मुलीच्या जन्मानंतर आई-वडील म्हणून बऱ्याच जबाबदाऱ्य़ा आल्या. तिच्या जन्मापूर्वी हवं तसं जगत होतो पण आता मुलीसाठी तिच्या पद्धतीनं जगतो असंही गीता म्हणाली. हरभजन शिवाय भारतीय क्रिकेट संघातील विराट कोहली आवडत असल्याचंही गीताने मुलाखतीमध्ये सांगितलं.

View this post on Instagram

❤️❤️❤️

A post shared by Geeta Basra (@geetabasra) on

बॉलीवूडमधील कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल असं विचारताच गीता म्हणाली की, तिला आयुष्यमान खुराणासोबत काम करायला आवडेल. त्याचे चित्रपट आणि अभिनय आवडतो. तसेच चित्रपटात कोण आहे यापेक्षा त्यामध्ये स्टोरी आणि विषय यावरून तो कसा ते ठरवलं पाहिजे असंही गीता म्हणाली.

वाचा : कॅप्टन कुलला राग येतो तेव्हा...,धोनीनं स्वत: सांगितला किस्सा

वाचा : विराटचा पत्ता लवकरच होणार कट? ‘या’ कारणामुळे रोहित होऊ शकतो नवा कर्णधार

VIDEO : '... म्हणून शरद पवारांना ईडीची नोटीस', मुख्यमंत्री फडणवीस यांचा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2019 09:21 AM IST

ताज्या बातम्या