हरभजनने सुचवला चौथ्या क्रमांकासाठी हा खेळाडू; फिरकी घेत युवराज म्हणाला, भावा...

वर्ल्ड कपमध्ये भारताला चौथ्या क्रमांकावरील फलंदाज डोकेदुखी ठरला होता. आता त्यावरून हरभजनची युवराजसिंगनं फिरकी घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2019 01:34 PM IST

हरभजनने सुचवला चौथ्या क्रमांकासाठी हा खेळाडू; फिरकी घेत युवराज म्हणाला, भावा...

मुंबई, 07 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट संघात सध्या चौथ्या क्रमांकावर कोण याचा प्रश्न डोकेदुखी ठरला आहे. वर्ल्ड कपमध्येसुद्धा याचीच चर्चा होती. आघाडीची फळी मजबूत असलेल्या भारताकडे मधल्या फळीत मात्र टिकून राहणाऱ्या फलंदाजांची कमतरता आहे. भारताचा फिरकीपटू हरभजनसिंगनं चौथ्या क्रमांकासाठी कोण योग्य आहे हे ट्विटरवरून सांगितलं. त्यानं सुचवलेल्या पर्यायावर युवराजसिंगनं फिरकी घेतली आहे.

हरभजनसिंगनं म्हटलं होतं की, भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर संजू सॅमसन हा योग्य पर्याय ठरू शकतो. सॅमसनने इंडिया ए कडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध 48 चेंडूत 91 धावांची खेळी केली. त्याच्या जोरावर 36 धावांनी विजय मिळवला.

हरभजनने ट्विट केलं की, एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर 4 साठी संजू सॅमसन का नाही. त्याच्याकडे चांगलं तंत्र आहे, खेळाची जाण आहे. दक्षिण आफ्रिका ए संघासाठी चांगला खेळला. हरभजनच्या या ट्विटरवर फिरकी घेत युवराज सिंगनं उत्तर दिलं आहे.

Loading...

युवराज म्हणाला की, भारताची आघाडीची फळी मजबूत आहे भावा.. त्यांना चौथ्या क्रमांकावर फलंदाजाची गरज नाही. यानंतर युवराजनं हसणारा इमोजी टाकला आहे. युवराजनं आघाडीच्या फळीबद्दल केलेली टिप्पणी योग्य असली तरी मधली फळी कमकुवत आहे. पहिले तीन फलंदाज बाद झाले की भारताची फलंदाजी ढेपाळते. याचा फटका वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्येही बसला होता.

VIDEO: मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 01:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...