• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • हरभजन सिंगने मुंबईतलं महालासारखं अपार्टमेंट विकलं, एवढ्या रुपयांमध्ये झाली डील

हरभजन सिंगने मुंबईतलं महालासारखं अपार्टमेंट विकलं, एवढ्या रुपयांमध्ये झाली डील

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग याने त्याचं मुंबईमधलं आलिशान अपार्टमेंट (Harbhajan Singh Mumbai Apartment) 17.58 कोटी रुपयांना विकलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर : भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग याने त्याचं मुंबईमधलं आलिशान अपार्टमेंट (Harbhajan Singh Mumbai Apartment) 17.58 कोटी रुपयांना विकलं आहे. याची माहिती रियल इस्टेटच्या डिलवर लक्ष ठेवणाऱ्या Zapkey.com जवळ असलेल्या कागदपत्रांमुळे मिळाली आहे. हरभजनच्या या अपार्टमेंटला जेबीसी इंटरनॅशनलने विकत घेतलं आहे. 18 नोव्हेंबरला ही डील झाली, तसंच अपार्टमेंट विकत घेणाऱ्याने स्टॅम्प ड्युटीसाठी 88 लाख रुपये दिले. मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार हरभजन सिंगचं हे अपार्टमेंट अंधेरीच्या रुस्तमजी एलिमेंट्सच्या नवव्या मजल्यावर होतं. या अपार्टमेंटचा एरिया जवळपास 2900 स्क्वेअर फूटचा आहे. डिसेंबर 2017 साली हरभजनने हे अपार्टमेंट विकत घेतलं होतं, तर मार्च 2018 साली त्याचं रजीस्ट्रेशन झालं होतं. त्यावेळी याची किंमत 14.5 कोटी रुपये होतीती. ज्या बिल्डिंगमध्ये हरभजन राहत होता तिकडे 3, 4 आणि 5 बीएचके अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंट आहेत, ज्यात अनेक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. Zapkey.com चे सहसंस्थापक संदीप रेड्डी म्हणाले, 'कोरोनानंतर रियालिटी मार्केट तेजीत आलं आहे. लक्झरी प्रॉपर्टीच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे.' याआधी श्रेयस अय्यरनेही (Shreyas Iyer) मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लोअर परेलच्या वर्ल्ड टॉवर्समध्ये 2618 स्क्वेअर फूटचं अपार्टमेंट विकत घेतलं होतं. त्याची किंमत 12 कोटी रुपये होती, यासाठी त्याला 24 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी द्यावी लागली होती. 'रन कर नाही तर...' हरभजन सिंहने 'या' दिग्गज खेळाडूला दिला गंभीर इशारा श्रेयस अय्यर करणार टेस्ट पदार्पण न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून (India vs New Zealand 1st Test) श्रेयस अय्यर भारतीय टेस्ट टीममध्ये पदार्पण करणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने ही घोषणा केली. विराट कोहलीने पहिल्या टेस्टमधून तर रोहित शर्माने टेस्ट सीरिजमधून विश्रांती घेतली आहे. तर केएल राहुलला दुखापत झाल्यामुळे तो सीरिजमधून बाहेर झाला आहे. राहुलऐवजी सूर्यकुमार यादवची टीममध्ये निवड करण्यात आली. यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या दोन मुंबईकरांमध्ये स्पर्धा होती. अखेर अजिंक्य रहाणे आणि राहुल द्रविडच्या जोडीने श्रेयस अय्यरवर विश्वास दाखवला. श्रेयसनं आजवर 92 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 52.18 च्या सरासरीनं 4592 रन काढले आहेत. यामध्ये 12 शतक आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.तर 202 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे.
  Published by:Shreyas
  First published: