मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

यांना ओळखलतं का?, हरभजनने शेयर केले अंडर-19 च्या काळातला Photo

यांना ओळखलतं का?, हरभजनने शेयर केले अंडर-19 च्या काळातला Photo

हरभजन सिंगने (Harbhajan Singh) शुक्रवारी सोशल मीडियावर आपल्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांमधला एक फोटो शेयर केला आहे. या फोटोंमधल्या खेळाडूंंनी ओळखण्याचं आव्हान त्याने चाहत्यांना दिलं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 10 डिसेंबर : हरभजन सिंगने (Harbhajan Singh) शुक्रवारी सोशल मीडियावर आपल्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांमधला एक फोटो शेयर केला आहे. हरभजनला आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये केकेआरकडून (KKR) खेळताना शेवटचं मैदानात पाहिलं गेलं होतं. आयपीएलच्या पहिल्या राऊंडमध्ये भारतात झालेल्या मॅचवेळी हरभजन खेळला, पण युएईमधल्या राऊंडमध्ये त्याला संधी मिळाली नाही. सोशल मीडियावर हरभजन आपलं मत स्पष्टपणे मांडतो, तसंच तो सोशल मीडियावर बराच सक्रीयही आहे.

हरभजन सिंगने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अंडर-19 च्या दिवसांचा एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये हरभजनसोबत दोन क्रिकेटपटू दिसत आहेत. या दोन क्रिकेटपटूंना ओळखून दाखवा, अंडर-19 वर्ल्ड कपचे दिवस 1998/99 असं कॅप्शन हरभजनने या फोटोंना दिलं आहे.

हरभजन सिंगच्या या फोटोमध्ये दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर (Imran Tahir) आणि पाकिस्तानचा हसन रझा (Hasan Raza) दिसत आहेत. हा फोटो 1998/99 अंडर-19 वर्ल्ड कपचा आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली होती. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. फायनलमध्ये श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.

इम्रान ताहिर दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याआधी ज्युनियर क्रिकेट पाकिस्तानकडून खेळला होता. यानंतर तो दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. ताहिरने 20 टेस्ट, 107 वनडे आणि 38 टी-20 आंतरराष्ट्रीय खेळल्या. दुसरीकडे रझाने 1996-2005 दरम्यान 7 टेस्ट आणि 16 वनडेमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं.

हरभजन सिंग 2016 साली टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून अखेरचा खेळला. हरभजनने 103 टेस्ट, 236 वनडे आणि 28 टी-20 मध्ये प्रतिनिधीत्व केलं. तो 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमचा भाग होता. हरभजनने टेस्टमध्ये 417 विकेट घेतल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. नुकतंच आर.अश्विनने (R Ashwin) हरभजन सिंगचं हे रेकॉर्ड मोडलं. अनिल कुंबळेने (Anil Kumble) टेस्टमध्ये 619 आणि कपिल देव (Kapil Dev) यांनी 434 विकेट घेतल्या आहेत.

First published:

Tags: Harbhajan singh