• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • रोहित शर्माच्या Duplicate चा सोशल मीडियावर धुमाकूळ! भज्जीनेही उडवली खिल्ली

रोहित शर्माच्या Duplicate चा सोशल मीडियावर धुमाकूळ! भज्जीनेही उडवली खिल्ली

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मासारख्या (Rohit Sharma) हुबेहुब दिसणाऱ्या माणसाने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. रोहितसारख्या दिसणाऱ्या या माणसाला बघून भारताचा माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) यालाही राहावलं नाही.

 • Share this:
  मुंबई, 30 सप्टेंबर : आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंची स्टाईल मारून त्यांच्यासारखंच दिसण्याचा प्रयत्न अनेकजण करतात, यात सगळेच यशस्वी होतात असं नाही. काही जण तर कोणतीही स्टाईल न करताच दुसऱ्यासारखे दिसतात. या जगात एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात, असं आपण अनेकदा ऐकलं आहे. टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मासारख्या (Rohit Sharma) हुबेहुब दिसणाऱ्या माणसाने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. रोहित शर्मासारखी दिसणारी ही व्यक्ती पाकिस्तानमधली असल्याचं सांगितलं जात आहे. झाडाजवळ बसून रोहितसारखा दिसणारा हा माणूस ज्यूस पिताना दिसत आहे. सेम टू सेम! विराट कोहली आणि शफाली वर्मा यांच्यातील फरक ओळखता येतो का? Photo रोहित शर्मासारख्या दिसणाऱ्या या माणसाला बघून भारताचा माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) यालाही राहावलं नाही. हरभजननेही या माणसाचा फोटो शेयर केला. कधीतरी आम्हालाही चहासाठी बोलव, असं म्हणत भज्जीने रोहित शर्माला या पोस्टमध्ये टॅग केलं. हरभजन सिंग आणि रोहित शर्मा भारतासाठी आणि आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) बराच काळ एकत्र खेळले. हरभजन सिंगने रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सुरुवातीचा संघर्षही बघितला. तसंच आयपीएलमध्येही दोघं एकमेकांच्या नेतृत्वात खेळले. हरभजन सिंग 2008 ते 2017 या काळात मुंबई इंडियन्ससोबत होता, तर रोहित शर्मा 2011 साली मुंबईच्या टीममध्ये आला. मुंबई इंडियन्सनंतर हरभजन सिंग दोन मोसम चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळला. 2020 सालच्या आयपीएलमध्ये हरभजन खेळला नाही, यानंतर त्याला 2021 साली कोलकात्याने संधी दिली. भारतात झालेल्या पहिल्या राऊंडमध्ये हरभजन तीन सामने खेळला, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. युएईतल्या आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये हरभजनला अजून खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएलमध्ये हरभजनने 163 सामन्यांमध्ये 150 विकेट घेतल्या, त्याचा इकोनॉमी रेटही 7.07 चा आहे. 2011 सालच्या चॅम्पियन्स लीगमध्ये मुंबई इंडियन्स हरभजनच्या नेतृत्वात चॅम्पियन झाली, यानंतर 2012 सालीही त्याने मुंबईचं नेतृत्व केलं. रोहितला करायची आहे इतिहासाची पुनरावृत्ती, सूर्याही साथ द्यायला तयार!
  Published by:Shreyas
  First published: