परदेशात खेळण्यासाठी निवृत्ती घेणार का? हरभजन सिंगने केला खुलासा

भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग गेल्या तीन वर्षांपासून संघातून बाहेर आहे. परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी तो निवृत्ती घेणार अशी चर्चा रंगली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 08:12 AM IST

परदेशात खेळण्यासाठी निवृत्ती घेणार का? हरभजन सिंगने केला खुलासा

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर शुक्रवाऱी हरभजन सिंगने स्पष्टीकरण दिलं आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार असून ब्रिटनमध्ये होणाऱ्या द हंड्रेड लीगमधून नाव मागे घेणार असल्याचं हरभजनने म्हटलं आहे.

हरभजनचे नाव खेळाडूंच्या यादीत होते. त्याच्या नावाची बेसप्राइज एक लाख पाउंड इतकी होती. बीसीसीआय निवृत्तीची घोषणा न करता अशा कोणत्याही लीगमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना परवानगी देत नाही. हरभजन म्हणाला की, माझे आयपीएल आणि चेन्नई सुपर किंग्जला प्राधान्य आहे. चेन्नईने गेल्या दोन्ही हंगामात फायनलला धडक मारली आहे. आता पुढच्या हंगामावर लक्ष आहे.

बीसीसीआयच्या नियमांचा मी सन्मान करतो आणि मी कधीच नियम मोडणार नाही. यासाठी माझे नाव मागे घ्यायला लागलं तरी चालेल. शंभऱ चेंडूंचे क्रिकेट आकर्षक आहे पण सध्यातरी यामध्ये खेळता येणार नाही. मला बीसीसीआयने परवानगी दिली तर यात भाग घेईन असंही हरभजन म्हणाला.

बीसीसीआय़च्या नियमानुसार कोणत्याही खेळाडूला परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याशिवाय परवानगी मिळत नाही. भारताचा दिग्गज खेळाडू युवराज सिंगला यामुळेच निवृत्ती जाहीर करावी लागली. त्यानंतरच तो कॅनडा ग्लोबल टी20 लीगमध्ये खेळू शकला.

द हंड्रेड लीगसाठी 25 परदेशी खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये हरभजन सिंग एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षी जुलै महिन्यात सुरू होईल. याची लिलाव प्रक्रिया 20 ऑक्टोंबरला लंडनमध्ये होणार आहे. सध्या हरभजनचे नाव ड्राफ्टमध्ये आहे. त्याची निवड झाल्यास पुढच्या निर्णयाबद्दल बीसीसीआयला सांगावे लागेल. स्पर्धेच्या नियमानुसार फक्त तीन परदेशी खेळाडू यात खेळू शकतात. हरभजनची निवड झाली तर तो निवृत्ती घेण्याची शक्यता नाकारण्यात येणार नाही.

Loading...

हरभजन सिंगने 103 कसोटीमध्ये 417 गडी बाद केले आहेत. कसोटीत भारताचा तो यशस्वी गोलंदाज आहे. भारताकडून सर्वाधिक 619 गडी बाद करण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याच्यानंतर कपिल देव 434 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हरभजनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 236 सामन्यात 269 गडी बादे केले आहेत. तर 28 टी20 सामन्यात त्याने 25 गडी बाद केले आहेत.

VIDEO : तावडेंना आता कळलं असेल, यादीत नाव नसलं की कसं वाटतं? एकच सोशलकल्लोळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 08:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...