10 वर्ष क्रिकेट खेळूनही 'या' मुंबईकर खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंदच! BCCIवर भडकला भज्जी

10 वर्ष क्रिकेट खेळूनही 'या' मुंबईकर खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंदच! BCCIवर भडकला भज्जी

भारताचा माजी स्पिनर हरभजनसिंग याने आणखी एका खेळाडूची भारतीय संघात निवड न झाल्याने प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 27 नोव्हेंबरपासून पासून चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने होणरा आहेत. या दौऱ्यासाठी नुकतीच बीसीसीआयने भारतीय संघाची (Team India) घोषणा केली. निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भारतीय संघाची निवड करण्यात आली. या दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये रोहित शर्माची निवड न करण्यात आल्याने मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर भारताचा माजी स्पिनर हरभजनसिंग याने आणखी एका खेळाडूची भारतीय संघात निवड न झाल्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. हरभजनसिंगने ट्विट करत भारतीय संघाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारतीय संघात या दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादव याची निवड नक्की समजली जात होती. पण या दौऱ्यात त्याची निवड न झाल्याने हरभजनसिंगने ट्विट करत प्रश्न विचारला आहे. त्याने ट्विट करत म्हटलं, ‘मला माहीत नाही की भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सूर्यकुमार यादव याला आणखी काय करावे लागणार आहे. आयपीएल आणि रणजी स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी केली आहे. प्रत्येकासाठी बीसीसीआयचा नियम वेगळा आहे का?’ निवड समितीने त्याचे रेकॉर्ड पाहण्याची विनंती हरभजनने केली आहे.

वाचा-भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जारी, या दिवशी होणार डे-नाइट टेस्ट

हरभजनने निवडीवर शंका घेतल्यामुळे तो आणि सूर्यकुमारची कामगिरी दोन्हींबाबत क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

वाचा-ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळाडू कुटुंबाला घेऊन जाणार? गांगुलीचे मोठे वक्तव्य

सूर्यकुमारची जबरदस्त कामगिरी

सूर्यकुमार यादवने या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत 11 सामन्यांत 283 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 2019 मधील आयपीएलमध्ये 44 धावा केल्या होत्या. याचबरोबर 2018 पासून आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 1219 धावा केल्या आहेत. पण या शानदार कामगिरीनंतर देखील त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली नाही.

वाचा-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, जखमी रोहित शर्मा संघाबाहेर

असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

या दौऱ्यात कर्णधार विराट कोहली तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचं नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर के. एल. राहुल हा एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये उपकर्णधार असणार आहे. रोहित शर्मा या दौऱ्यातून बाहेर असल्याने राहुलकडे उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा जखमी झाल्याने या दौऱ्यात तो खेळू शकणार नाही. त्याचबरोबर आयपीएलमध्ये जखमी झाल्याने इशांत शर्मा याचीदेखील संघात निवड झालेली नाही.

Published by: Priyanka Gawde
First published: October 28, 2020, 2:22 PM IST
Tags: team india

ताज्या बातम्या