'ब्लडी इंडियन्स' म्हणणाऱ्या 'जेट'च्या पायलटवर हरभजन भडकला

जेट एअरवेजच्या पायलटने दोन भारतीयांना 'यू ब्लडी इंडियन्स गेट आऊट माय एअर क्राफ्ट' असं म्हणून अपमानित केलाय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2017 05:41 PM IST

'ब्लडी इंडियन्स' म्हणणाऱ्या 'जेट'च्या पायलटवर हरभजन भडकला

26 एप्रिल : एअर इंडिया आणि सेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा राडा निपडल्यानंतर आता जेट एअरवेजच्या पायलटचा आगाऊपणा पुढे आलाय. जेट एअरवेजच्या पायलटने दोन भारतीयांना 'यू ब्लडी इंडियन्स गेट आऊट माय एअर क्राफ्ट' असं म्हणून अपमानित केलाय. याबद्दल  भारतीय किक्रेटर हरभजन सिंग यांनी जोरदार आक्षेप घेत पंतप्रधान मोदींकडेच तक्रार केलीये.

घडलेली हकीकत अशी की, सध्या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या हरभजन सिंग जेट एअरवेजने प्रवास करत असताना दोन घटनांना सामोरं गेला. याबद्दल त्याने टि्वट करून तीव्र नाराजी व्यक्त केली. भज्जी टि्वटमध्ये म्हणतो, बर्नाड होसलिन नावाच्या पायलटने  जेट एअरवेजने प्रवास करणाऱ्या दोन भारतीयांचा अपमान केला. विमानातून उतरत असताना या प्रवाशांना यू ब्लडी इंडियन्स गेट आऊट माय एअर क्राफ्ट ,असं म्हणत अपमानित केलं आहे.

दुसऱ्या टि्वटमध्ये भज्जी म्हणतो, हा पायलट एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने विमानात असलेल्या एक महिला आणि एका दिव्यांग व्यक्तीसोबत धक्काबुक्की केली. हे सर्व खूप वेदनादायी होतं.

भज्जीच्या टि्वटनंतर जेट एअरवेजने तातडीने या प्रकरणावर खुलासा करत आम्ही प्रवाशांकडून प्रतिसाद मागवून घेतला असून असं काही घडलं असेल तर खेद व्यक्त केलाय. तसंच या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जेट एअरवेजनं दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...