'हरभजन तुला लाज नाही वाटत', Chandrayaan-2च्या ट्वीटवर भडकले नेटिझन्स

'हरभजन तुला लाज नाही वाटत', Chandrayaan-2च्या ट्वीटवर भडकले नेटिझन्स

भारताचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंग यानं सोमवारी Chandrayaan-2संदर्भात केलेल्या ट्वीटवर चाहते भडकले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जुलै : चंद्रयान-2च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या कामगिरीवर सर्व भारतीय खुश आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने केलेल्या नियोजनानुसार चांद्रयान 2 यशस्वीपणे आकाशात झेपावले. GSLV मार्क III-M1 या प्रक्षेपकाच्या मदतीनं चांद्रयान 2ने उड्डाण केलं. GSLV मार्क III-M1 हे भारताचं सर्वात मोठं प्रक्षेपक यान आहे. रविवारी संध्याकाळी 6.43 वाजल्यापासून काउंटडाऊनदेखील सुरू झालं होतं. श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवण अंतराळ केंद्रावरून या यानाने उड्डाण केलं. अभिनेत्यांपासून, खेळाडूंपर्यंत सर्वच इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक करत आहेत.

मात्र या सगळ्यात भारताचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंग यानं सोमवारी केलेल्या ट्वीटवर चाहते भडकले आहे. त्यामुळं सध्या याच ट्विटवरून भज्जीला ट्रोल करण्यात आले आहे. भज्जनीनं पाकिस्तानसह काही देशांच्या झेंड्याचा वापर करून, काही देश चंद्रावर पोहचले आहेत तर, काही देशांच्या फक्त झेंड्यात चंद्र आहे. असे ट्वीट केले होते.

हरभजन सिंगनं केलेल्या या ट्वीटमध्ये पाकिस्तानसोबतच तुर्की लिबिया, ट्यूनिशीया, अजरबैजान, अल्जिरिया, मलेशिया, मालदीव आणि मॉरिटानिया या देशांच्या झेंड्यांचा समावेश आहे. तर, चंद्रावर पोहचणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, चीन, रूस आणि भारत या देशांचा समावेश आहे. मात्र या ट्विटवरून भज्जीला ट्रोल करण्यात आले आहे. भज्जीनं धर्माचा वापर करून भारतानं मिळवलेल्या या यशावर पाणी फिरवले आहे. इस्लाम आणि मुस्लीम देशांवर असे ट्वीट करण्याची गरज नव्हती असे मत व्यक्त केले होते.

24 तासांमध्ये दुरुस्त केला बिघाड

बिघाड झाल्यानंतर इस्रोच्या इंजिनिअर्सनी अवघ्या 24 तासात तांत्रिक बिघाड शोधून काढून तो दुरुस्त केला. त्यानंतर काही दिवस त्याची चाचणी घेतली गेली आणि नंतर यान उड्डाणासाठी सज्ज केलं गेलं. शास्त्रज्ञांनी दिवस रात्र जी कठोर मेहेनत घेतली त्या मेहेनतीचं हे फळ, असल्याची प्रतिक्रिया इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी व्यक्त केली.

VIDEO: गायिका वैशाली माडे 'या' कारणामुळे पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर

Published by: Akshay Shitole
First published: July 23, 2019, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading