Home /News /sport /

शेतकरी आंदोलनावर हरभजन सिंगचं ट्विट, म्हणाला...

शेतकरी आंदोलनावर हरभजन सिंगचं ट्विट, म्हणाला...

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं आहे.

    नवी दिल्ली, 11 डिसेंबर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला बॉक्सर विजेंदर सिंग, क्रिकेटपटू मनदीप सिंग यांच्यासारखे खेळाडू, मिका सिंग आणि दिलजीत दोसांज यांच्यासारखे अभिनेते शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) पाठिंबा देत आहेत. आता क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं आहे. हरभजनने शेतकरी आंदोलनाबाबत तीन दिवसात चार ट्विट आणि एवढीच रिट्विट केली आहेत. पण गुरुवारी त्याने केलेलं ट्विट इशाऱ्याचा संदेश होता. सरकार आणि शेतकरी आंदोलकांच्या या वादात हरभजन सिंग आंदोलकांच्या बाजूने आहे. कोणत्याही व्यक्तीवर विचार करून विश्वास ठेवा, कारण मीठही साखरेसारखं दिसतं, असं हरभजन म्हणाला. या ट्विटमध्ये हरभजनने शेतकरी आंदोलन किंवा सरकारचं नाव घेतलं नाही. हरभजनने याआधी 7 आणि 8 डिसेंबरला काही फोटो आणि व्हिडिओ रिट्विट केले होतं. यामध्ये शेतकरी मदतीसाठी बनवलेले शेल्टर होम, औषधांची पाकिटं दाखवण्यात आली होती. तर एका व्हिडिओमध्ये एक शेतकरी वृद्ध माणसाचे पाय दाबत आहे. हरभजनने 8 आणि 9 डिसेंबरला ट्विट केलं, त्यात तो शेतकरीच हिंदूस्तान आहे आणि शेतकरी आमचा सन्मान आहे, असं म्हणाला. हरभजन सिंह किसान आंदोलन के पक्ष में 3 दिन में 3 ट्वीट कर चुके हैं. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत. पंजाबमधून सुरू झालेलं हे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर येऊन धडकलं आहे. केंद्र सरकारने सुरक्षा यंत्रणांचा वापर करून आंदोलकांना दिल्लीत येण्यापासून रोखलं आहे. आंदोलन संपवण्यासाठी सरकारने 5 स्तरावर चर्चाही केली, पण यानंतरही कोंडी फुटलेली नाही. सरकार आणि शेतकरी यांच्यात आता लवकरच सहाव्यांदा बैठक होईल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या