मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'खलिस्तानी' वाद वाढल्यानंतर हरभजन सिंगने मागितली माफी

'खलिस्तानी' वाद वाढल्यानंतर हरभजन सिंगने मागितली माफी

भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) खलिस्तानी दहशतवाद्यांना शहीद म्हणाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता, याप्रकरणी आता हरभजन सिंगने माफी मागितली आहे.

भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) खलिस्तानी दहशतवाद्यांना शहीद म्हणाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता, याप्रकरणी आता हरभजन सिंगने माफी मागितली आहे.

भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) खलिस्तानी दहशतवाद्यांना शहीद म्हणाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता, याप्रकरणी आता हरभजन सिंगने माफी मागितली आहे.

मुंबई, 7 जून: भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) खलिस्तानी दहशतवाद्यांना शहीद म्हणाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता, याप्रकरणी आता हरभजन सिंगने माफी मागितली आहे. मला व्हॉट्सऍपवर आलेला तो फॉरवर्ड मेसेज होता, मी घाई करून तो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्याची चूक केली, असं स्पष्टीकरण हरभजन सिंगने दिलं आहे.

हरभजन सिंग सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतो, पण यावेळी त्याच्या एका पोस्टमुळे मोठा वाद झाला. शनिवारी त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली, यामध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात मारल्या गेलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांचा फोटोवर शहीद लिहून त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. हरभजनची ही पोस्ट सोशल मीडियावर ट्रेण्ड व्हायला सुरुवात झाली.

हरभजन त्याच्या माफीनाम्यात म्हणाला, 'मी हे स्पष्ट करू इच्छितो, की तो व्हॉट्सऍपवर आलेला फॉरवर्डेड मेसेज होता. याची पडताळणी न करता मी सोशल मीडियावर पोस्ट केलं. या पोस्टशी तसंच त्याच्या विचारांशी आणि त्या फोटोमध्ये असलेल्या लोकांबाबत माझी सहमती नाही. मी एक शिख आहे, जो भारतासाठी लढेल देशाविरुद्ध नाही.'

'देशवासीयांच्या भावना दुखावल्याबद्दल मी माफी मागतो. देशविरोधी कृत्य करणाऱ्या कोणत्याही संघटनेचं मी समर्थन करत नाही. मी देशासाठी 20 वर्ष घाम गाळला आहे, भारताविरुद्धच्या कोणत्याही गोष्टीचं मी कधीही समर्थन करणार नाही,' असं हरभजन म्हणाला.

हरभजननं अमृतसरमधील सुवर्ण मंदीरात (Golden Temple Amritsar) ऑपरेशन ब्लू स्टारच्या (Operation Blue Star) कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ऑपरेशन ब्लू स्टारच्या कारवाईला 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं हरभजननं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये हरभजननं एक फोटो अपलोड केला असून त्यात खलिस्तानी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रावालेचा (Jarnail Singh Bhindranwale) फोटो आहे. हरभजनं या पोस्टमध्ये या दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांना 'शहीद'चा दर्जा देत प्रणाम केला होता.

हरभजननं काही वेळानं ही पोस्ट काढून टाकली. मात्र त्याचा स्क्रीन शॉट व्हायरल झाला आहे. या पोस्टमधील फोटोवर पंजाबीमध्ये मजकूर आहे. "स्वाभिमानाने जगणे आणि धर्मासाठी मरणे. 1 ते 6 जून 1984 या कालावधीमध्ये सचखंड श्री हरमंदिर सिंह साहबमध्ये झालेल्या हत्याकांडात शहीद झालेल्या सर्वांना कोटी कोटी नमन.'' असं या फोटोवर लिहिण्यात आलं होतं.

First published:

Tags: Harbhajan singh