कपिल शर्माच्या शोमध्ये हरभजनचा खुलासा, बायकोसोबत भांडणानंतर सासूने दिली होती शिक्षा; पाहा VIDEO

कपिल शर्माच्या शोमध्ये हरभजनचा खुलासा, बायकोसोबत भांडणानंतर सासूने दिली होती शिक्षा; पाहा VIDEO

भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगने कपिल शर्मा शोमध्ये अनेक खुलासे केले आहेत. त्यात इंग्रजी येत नसल्यानं मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर काय बोलायचं याची भीती मला आणि विरेंद्र सेहवागला वाटायची असंही तो म्हणाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री गिता बासरा दोघेही कॉमेडी किंग कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो' मध्ये गेले होते. त्यावेळी हरभजन सिंहने त्याच्या लग्नाबद्दल आणि इतर काही गोष्टींवर खुलासा केला. यामध्ये त्याने पत्नीसोबत भांडल्यानंतर सासूने कशी शिक्षा दिली हेसुद्धा सांगितलं. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'द कपिल शर्मा शो' मध्ये हरभजन सिंग आणि गिता बासरा यांनी त्यांच्या भांडणाबद्दल सांगितलं. हरभजन म्हणाला की, एकदा आमच्यात भांडण झालं तेव्हा तिने घरी तिच्या आईला फोन केला. त्यानंतर सांगितलं की, हरभजनसोबत खूप मोठं भांडण झालंय आणि मी तीन महिन्यांसाठी घरी येत आहे. यावर गीताच्या आईने म्हटलं तिला की, मुली तू तिथंच थांब, ज्यानं चूक केलीय त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. तू थांब तिथेच मी सहा महिन्यांसाठी तिकडे येत आहे.

हरभजनने या शोमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडबद्दलही सांगितलं. लंकेतील एका मुलीशी मैत्री झाली होती. तिच्याकडून इंग्रजी शिकण्यात कशी मदत झाली तेसुद्दा हरभजनने सांगितले. इंग्रजीच्या बाबतीत वाईट अवस्था होती. पण गेल्या वर्षी इंग्लिश कमेंट्रीदेखील केली असंही हरभजन म्हणाला.

इंग्रजीची भिती किती होती हे सांगताना हरभजन म्हणाला की, चांगली कामगिरी केल्यानंतरही मी आणि विरेंद्र सेहवाग मनातून भीत असू कारण मॅन ऑफ द मॅच मिळाला तर तिथं इंग्रजी बोलायला लागायचं. खरं तर आमचा सामना तेव्हा सुरू व्हायचा. ज्यावेळी अंडर 19 मध्ये खेळत होतो तेव्हा इंग्रजी येत नव्हती. तेव्हा कोणी काही विचारलं तर तोंडात काही तरी चघळत बसायचं आणि म्हणायचो की "या... वी विल टॉक."

पोरांची फी बाकी, मंत्रालयासमोर आत्महत्याच करेन; पवारांसमोर शेतकरी ढसाढसा रडला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 08:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading