VIDEO : धोनीच्या चलाखीवर भज्जीची फिरकी, हैदराबादला झटका

VIDEO : धोनीच्या चलाखीवर भज्जीची फिरकी, हैदराबादला झटका

हरभजनसिंगनं हैदराबादला दोन मोठे झटके दिले.

  • Share this:

चेन्नई, 23 एप्रिल : महेंद्रसिंग धोनीच्या चलाखीपुढं सगळ्याच संघांनी हात टेकले. त्याचाच प्रत्यय आजच्या सामन्यात सामन्यात आला. चेन्नई आणि हैदाराबाद यांच्यात चेपॉकवर सुरु असलेल्या सामन्यात धोनीच्या अश्याच एका चालीनं हैदराबादला एक मोठा धक्का दिला.

चेन्नईनं प्रथम नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजीचे आमंत्रण दिलं. दरम्यान, हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनला आजच्या सामन्याला मुकावं लागलं. त्यामुळं भुवनेश्वर कुमारकडं पुन्हा कर्णधारपद आलं.

धोनीनं पहिला षटक राहुल चहरला दिला आणि त्यानं उत्तम गोलंदाजी करत, 4 धावा दिल्या. त्यानंतर धोनीनं चतुराईनं हरभजन सिंगच्या हातात चेंडू दिला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या डेव्हिड वॉर्नरचीही विकेट या जोडीनं काढली. वॉर्नर 45 चेंडूत 57 धावा करत बाद झाला.

याआधी डेव्हिड वॉर्नरनं आयपीएलमधील त्याचे हे 43वे अर्धशतक पुर्ण केलं. चेन्नईविरुद्ध त्याचे हे सहावे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह त्याने शिखर धवन, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. पांडेचे हे आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने 2016मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध 26 चेंडूंत 50 धावांची खेळी केली होती. दरम्यान, भज्जीनं आपल्या तिसऱ्या चेंडूवर हैदराबादच्या सलामीवीर जॉनी बेअरस्टोला बाद केलं. तर, महेंद्रसिंग धोनीनं यष्टिमागे त्याचा सुरेख झेल टिपला.

डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो हे हैदराबादकरिता सगळ्यात यशस्वी फलंदाज आहेत. बेअरस्टोनं 158.36च्या स्ट्राईक रेटनं 445 धावा केल्या आहेत. यात 114 हा त्याचा सर्वात जास्त धावा केल्या आहेत. तर, डेव्डिड वॉर्नर सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आहे.

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघानं यंदाही आयपीएलमध्ये दणक्यात सुरुवात केली. पहिल्या आठ सामन्यांपैकी सात सामने जिंकून दणक्यात सुरुवात केली. मात्र गेल्या दोन सामन्यात सलग पराभवामुळं चेन्नईचा दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्यामुळं धोनीला आपल्या मधल्या फळीची चिंता सतावत आहे.

VIDEO : मनसेसैनिकांचा नवा लूक, 'लाव रे तो व्हिडिओ'

First published: April 23, 2019, 9:10 PM IST

ताज्या बातम्या