• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'अनपड महिला पत्रकार' Harbhajan Singh ने PAK च्या पत्रकाराला दिले चोख प्रत्युत्तर

'अनपड महिला पत्रकार' Harbhajan Singh ने PAK च्या पत्रकाराला दिले चोख प्रत्युत्तर

Harbhajan Singh

Harbhajan Singh

पाकिस्तानी महिला पत्रकार इकरा नसीर यांनी खोचक ट्विट करत हरभजन सिंगला (Harbhajan Singh) डिवचण्याचा प्रयत्न केला. पण, हरभजन सिंगनेदेखील अनपड महिला पत्रकार म्हणत इकरा नसीर यांना चोख प्रत्युत्तर दिले.

 • Share this:
  दुबई, 28 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मॅच झाल्यापासून हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि मोहम्मद आमिर (Mohammad Amir) यांच्यात वाद सुरू आहे. या वादात आता आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे. पाकिस्तानी महिला पत्रकार इकरा नसीर यांनी खोचक ट्विट करत हरभजन सिंगला डिवचण्याचा प्रयत्न केला. पण, हरभजन सिंगनेदेखील अनपड महिला पत्रकार म्हणत इकरा नसीर यांना चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी महिला पत्रकार इकरा नसीर यांनी हरभजन सिंग आणि शाहिद आफ्रिदी या वादात उडी घेत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये हरभजन सिंग गोलंदाजी करताना दिसत आहे आणि शाहिद आफ्रिदी फलंदाजी करताना दिसत आहे. आफ्रिदीने चार चेंडूत चार षटकार ठोकले. यानंतर त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हरभजन सिंग तुमच्या आठवी साठी. चार चेंडूत चार षटकार आणि हो कसोटी सामना. याला प्रत्युत्तर म्हणून हरभजन सिंगने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये हरभजन सिंग आफ्रिदीच्या चेंडूंवर गगनचुंबी षटकार मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत भज्जी अनपड महिला पत्रकार हे तुमच्यासाठी अशी कॅप्शन दिली आहे. टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मॅच झाल्यापासून हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि मोहम्मद आमिर (Mohammad Amir) यांच्यात वाद सुरू आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये ट्विटरवर जोरदार वाद (Twitter War) झाला. त्या वादामध्ये आमिरनं सभ्य भाषेची मर्यादा ओलांडली. त्यानंतर हरभजननं व्हिडीओ शेअर करत पाकिस्तानच्या बॉलरची कानउघाडणी केली आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: