नवी दिल्ली, 01 जानेवारी : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी साजरी करत आहे. दोघांनी नव्या वर्षाचं स्वागत याठिकाणी केलं. बर्फाने अच्छादलेल्या टेकड्यांवरूनच दोघांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. विराट कोहली जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता तेव्हा अनुष्काने त्याची गळाभेट घेतली.
टीम इंडिया नव्या वर्षात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी विराट कोहली सुट्टी एन्जॉय करत आहे. कोहलीने म्हटलं की आम्ही दोघेही खूप सुंदर अशा ग्लेशिअरवर आहे आणि विचार केला की इथूनच सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा व्हिडिओतून द्याव्यात.
विराट कोहलीने त्याचा एक फोटो मंगळवारी शेअर केला होता. त्याचे क्रेडिट अनुष्का शर्माला देत तिला बेस्ट फोटोग्राफर म्हटलं होतं. कोहलीने म्हटलं की, फोटोबाबत काहीच वाद नाही जेव्हा एक बेस्ट फोटोग्राफर तो क्लिक करतो. विराटने या ट्रीपमधील आणखी काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत.
भारताचा कर्णधार विराट कोहली सुट्टीवरून परत आल्यानंतर पुन्हा व्यग्र होईल. टीम इंडियाला जानेवारीच्या सुरुवातीला लंकेविरुद्ध तीन टी20 सामने खेळावे लागणार आहेत. यानतंर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ पाच टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
धोनीच्या पावलावर पाऊल टाकत सहकारी खेळाडू लष्करात, शेअर केला PHOTO मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.