मुंबई, 04 ऑगस्ट: मैत्री म्हटलं की सगळ्यात आधी आपल्याला आठवतात ते बालपणीचे मित्र. त्यांच्यासोबत जोडलेल्या अखंड आठवणी आणि प्रत्येक टप्प्यावरच्या कहाण्या. अशीच एक कमाल मित्रांची जोडी भारतीय संघालाही लाभली, ज्यांच्या शालेय जीवनातील विक्रमांची चर्चा आजतागायत होत आहे. ही जोडी आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची. आपल्या मैत्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दोघांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
तेंडुलकर आणि कांबळी या दोघांनी क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतले. दरम्यान मधल्या काही वर्षांत या दोघांमध्ये दुरावा आला होता, मात्र आता पुन्हा दोघं चांगले मित्र झाले आहेत. दरम्यान फ्रेंडशीप डेचे औचित्य साधत सचिननं विनोद कांबळी सोबतचा फोटो ट्वीट केला आहे. सचिननं कांबळी सोबतचा आपल्या शालेय जीवनातील एक फोटो शेअर केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिननं हा फोटो शेअर करत, "कांबळ्या शालेय दिवसातील या फोटो मला मिळाला आहे. जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत, म्हणून हा फोटो पुन्हा टाकतोय", असे कॅप्शन लिहिले आहे. शालेय क्रिकेटमध्ये सचिन आणि कांबळी यांच्या जोडीनं नाबाद 664 धावांची भागिदारी केली होती, जो एक रेकॉर्ड झाला होता.
वाचा- 'कांबळ्या...', Friendship Dayआधी जुन्या आठवणींना सचिन झाला भावुक!
Kamblya, found this photo of ours from our school days. Memories came rushing back and thought of sharing this. pic.twitter.com/pUkOablTAX
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 3, 2019
दरम्यान सचिनने टाकलेल्या या फोटोवर विनोद कांबळीने त्यांच्या मैत्रीचा आणि क्रिकेटचा एक मजेदार किस्सा सांगितला. कांबळीनं, "सचिन तुला आठवतं आहे का, आपण जेव्हा गोलंदाजी करत होतो तेव्हा मध्येच मैदानावर पतंग आला होता. त्यानंतर मी बॅट सोडून पतंग उडवत बसलो. तु आचरेकर सरांना येताना पाहिलसं पण मला सांगितलं नाहीस, मग तुला माहितचं असेल काय झालं ते", असे ट्वीट केले.
वाचा- एकेकाळी पैशांसाठी खेळायचा क्रिकेट, आता उडवतोय विंडीज फलंदाजांची झोप!
This brought back memories, Master! You remember this one time when we were batting & a kite fell on the pitch. I took the kite & started flying it. You saw Achrekar Sir coming my way but didn’t tell me and we both know what happened next!
Aathavtay ka? https://t.co/42a0pvoQd3 — VINOD KAMBLI (@vinodkambli349) August 3, 2019
फ्रेंडशीप डे दिवशी विनोद कांबळी दरवर्षी सचिन तेंडुलकरसाठी एक खास मेसेज लिहितो. सचिन आणि कांबळी यांच्यात 2009मध्ये दुरावा आला होता, जेव्हा एका टीव्ही शोमध्ये कांबळीनं सचिननं मला क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी मदत केली नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर तब्बल 8 वर्षांनी 2017मध्ये यांच्यातील दुरावा मिटला.
वाचा- INDvsWI : पंतचा 'धोनी अवतार', विराटनं केलं कौतुक
VIDEO: मुंबईच्या रेल्वे स्टेशनचा झाला धबधबा, प्रवाशांचे प्रचंड हाल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sachin tendulkar, Vinod kambli