Happy Birthday Zaheer Khan : बापच म्हणाला, बेटा इंजिनिअरिंग सोड क्रिकेट खेळ! या एका वाक्यानं बदललं दिग्गज क्रिकेटपटूचं आयुष्य

ज्या देशात मुलांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे बाबांना वाटते, त्याच बाबांनी देशाला एक दिग्गज क्रिकेटपटू दिला.

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 02:02 PM IST

Happy Birthday Zaheer Khan : बापच म्हणाला, बेटा इंजिनिअरिंग सोड क्रिकेट खेळ! या एका वाक्यानं बदललं दिग्गज क्रिकेटपटूचं आयुष्य

मुंबई, 07 ऑक्टोबर : भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी फक्त आणि फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळं भारताचे बरेच क्रिकेटपटू हे जास्त शिक्षित नाही. मात्र भारताच्या एका दिग्गज क्रिकेटपटूला चक्क त्याच्या वडिलांनी इंजिनिअरिंग करू नको, असा सल्ला दिला होता. एकीकडे मुलं क्रिकेट खेळतात म्हणून ओरडणारे बाबा, तर दुसरीकडे मुलाला अभ्यास करू नको असे म्हणून क्रिकेटकडे वळवणारे बाबा. मात्र याच बाबांमुळं भारताला एक दिग्गज क्रिकेटपटू मिळाला. त्याचे नाव आहे, जहीर खान (Zaheer Khan).

भारताचा माजी गोलंदाजी जहीर खान आज 41 वर्षांचा झाला आहे. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातून आलेल्या जहीरनं भारताला अनेक सामने जिंकून दिले. 2000मध्ये केनिया विरोधात झालेल्या सामन्यात जहीरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सामन्य घरात जन्माला आलेल्या जहीरनं शाळेनंतर मॅकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश केला होता. मात्र फावल्या वेळात क्रिकेट खेळण्यात त्याला जास्त आनंद मिळत होता. हे पाहून त्याच्या बाबांनी एक मोठा निर्णय घेतला.

वाचा-रोहित शर्माच्या वक्तव्यानं ऋषभ पंतचे करिअर धोक्यात, म्हणाला...

वडीलांनी सांगितले इंजिनिअरिंग सोड क्रिकेट खेळ

कॉलेजमध्ये असताना जहीर खानची ओळख माजी क्रिकेटर सुधीर नाईक यांच्याशी झाली होती. त्यांनी पूर्ण वेळ क्रिकेटसाठी देण्याची विनंती जहीरला केली. त्यानंतर जहीरच्या वडीलांनी त्याला इंजिनिअरिंग सोडून क्रिकेट खेळण्यास सांगितले. त्यानंतर याच जहीरनं भारतासाठी 610 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात 311 कसोटी, 282 एकदिवसीय आणि 17 टी-20 सामन्यांचा समावेश आहे.

Loading...

जहीर खानच्या नावावर अगणित विक्रम

भारतासाठी सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जहीरचा चौथा क्रमांक लागतो. या यादीत अनिल कुंबळे (619), कपिल देव (437) आणि हरभजन सिंग (411) यांचा जहीरच्याआधी क्रमांक लागतो. मात्र जहीर खान सर्वात जास्त विकेट घेणारा दुसरा जलद गोलंदाज आहे. जहीरनं आपल्या करिअरमध्ये 237वेळा डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद केले आहे.

वाचा-फलंदाजाला बोल्ड झाल्याचं कळालच नाही, पाहा शमीचा तुफानी इनस्विंग

फलंदाजीमध्येही होते कमालीचे रेकॉर्ड

2004मध्ये बांगलादेश विरोधात कसोटी सामना खेळताना 11व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जहीर खाननं 75 धावा केल्या होत्या. या धावा 11व्या फलंदाजानं केलेल्या सर्वोच्च धावा आहेत. याच डावात 10व्या विकेटसाठी जहीर आणि सचिन तेंडुलकरनं 133 धावांची विक्रमी भागिदारी केली होती.

वाचा-विमान नाही, पक्षी नाही; हा तर निघाला सर जडेजा! अफलातून कॅचचा VIDEO

SPECIAL : 'रावडी नितीन' : 'डॅशिंग' नितीन नांदगावकरांची बेधडक मुलाखत एकदा ऐकाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2019 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...