एका CDमुळं टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू झाला कोल्हापूरचा जावई!

Happy Birthday Zaheer Khan : एकेकाळी आपल्या स्विंगमुळं फलंदाजांची झोप उडवणाऱ्या जलद गोलंदाजाचा आज वाढदिवस आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2019 04:18 PM IST

एका CDमुळं टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू झाला कोल्हापूरचा जावई!

मुंबई, 07 ऑक्टोबर : एकेकाळी आपल्या स्विंगमुळं फलंदाजांची झोप उडवणारा आणि भारताला अनेक सामना जिंकून देणाऱ्या दिग्गज खेळाडूचा आज वाढदिवस आहे. या खेळाडूची कहानी एखाद्या सिनेमासारखी आहे. आज भारताच्या स्विंग मास्टर आणि दिग्गज क्रिकेटपटूचा वाढदिवस आहे. या खेळाडूचं नाव आहे झहीर खान. आज जहीरचा 41वा वाढदिवस आहे.

जहीरचा जन्म अहमदनगर येथे 1978मध्ये झाला. 2000मध्ये केनिया विरोधात झालेल्या सामन्यात झहीरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जहीरनं भारतासाठी 610 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात 311 कसोटी, 282 एकदिवसीय आणि 17 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. जहीरनं 2017मध्ये अभिनेत्री सागरिका घाटगेशी विवाह केला. मात्र त्याची लव्हस्टोरी वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही की, सेलिब्रिटींच्या प्रेमातही एवढे अडथळे येत असतील.

सागरिका घाटगे मुळची कोल्हापूरची, चक दे इंडिया या सिनेमानंतर नावारूपाला आलेल्या सागरिकानं मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. दरम्यान खुप कमी लोकांना माहित होते की सागरिकाच्या हॉकीच्या अंदाजावर क्रिकेटपटू फिदा झाला होता. मीडियापासून लपूनछपून जवळजवळ एक-दीड वर्ष जहीर आणि सागरिका डेट करत होते. मात्र अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

एका CDमुळं झालं लग्न

झहीर खान क्रिकेटपटू असला तरी त्याच्या घरचे वातावरण तेवढे मोकळे नव्हते. झहीरनं घरी सांगितले तेव्हा त्याच्या घरच्यांनी या नात्याला परवानगी दिली नाही, याचे कारण होते सागरिकाचे सिनेमात काम करणे. दरम्यान घरच्यांना समजवता समजवताच घरच्यांनी त्याच्यासमोर एक अट ठेवली. या अटनुसार घरच्यांना सागरिकाचा चक दे इंडिया सिनेमा पाहायचा होता. त्यानुसार जहीरनं घरच्यांना CD आणून दिली. दरम्यान घरच्यांनी सिनेमा पाहिल्यानंतर दोघांच्या लग्नाला होकार दिला.

Loading...

वाचा-बापच म्हणाला, इंजिनिअरिंग सोड क्रिकेट खेळ! या वाक्यानं बदललं क्रिकेटपटूचं आयुष्य

 

View this post on Instagram

 

Partners for life. #engaged💍

A post shared by Sagarika Ghatge Khan (@sagarikaghatge) on

वाचा-भारताला मिळाला दुसरा सेहवाग! ‘या’ खेळाडूच्या निडर खेळीनंतर दिग्गजांनी केलं मान्य

झहीर खानच्या नावावर अगणित विक्रम

भारतासाठी सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत झहीरचा चौथा क्रमांक लागतो. या यादीत अनिल कुंबळे (619), कपिल देव (437) आणि हरभजन सिंग (411) यांचा झहीरच्याआधी क्रमांक लागतो. मात्र झहीर खान सर्वात जास्त विकेट घेणारा दुसरा जलद गोलंदाज आहे. झहीरनं आपल्या करिअरमध्ये 237वेळा डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद केले आहे.

फलंदाजीमध्येही होते कमालीचे रेकॉर्ड

2004मध्ये बांगलादेश विरोधात कसोटी सामना खेळताना 11व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या झहीर खाननं 75 धावा केल्या होत्या. या धावा 11व्या फलंदाजानं केलेल्या सर्वोच्च धावा आहेत. याच डावात 10व्या विकेटसाठी जहीर आणि सचिन तेंडुलकरनं 133 धावांची विक्रमी भागिदारी केली होती.

वाचा-टीम इंडियाच्या स्टारनं शेअर केला बाळाचा पहिला फोटो, विजयानंतर केलं 'बाप' काम

VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 05:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...