Happy Birthday Virat Kohli : बर्थ डे बॉय विराट कोहली झाला टिक टॉक स्टार? VIDEO VIRAL

विराट कोहलीचा हा डुप्लिकेट सध्या टिकटॉक स्टार झाला आहे. त्याच्या व्हिडिओमुळं चाहतेही संभ्रमात आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 05:15 PM IST

Happy Birthday Virat Kohli : बर्थ डे बॉय विराट कोहली झाला टिक टॉक स्टार? VIDEO VIRAL

मुंबई, 05 नोव्हेंबर : क्रिकेट जगतात फक्त एकच खेळाडू आहे ज्याचा दबदबा कायम आहे. असा एकही रेकॉर्ड नाही ज्याची नोंद भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असंख्य विक्रम करणारा विराटनं आज 31व्या वर्षात पदापर्ण केले. क्रिकेट बरोबरच विराट ओळखला जातो, तो त्याच्या फिटनेससाठी. क्रिकेटमध्ये विराटसारखा फिट खेळाडू होणे नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 20 हजार धावांचा आकडा पार करणाऱ्या विराटनं दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरला मागे टाकले. एवढेच नाही तर दिग्गज क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमनचा विक्रमही मागे टाकला आहे.

मात्र आता विराटला एका व्यक्तिनं मागे टाकले आहे. ही व्यक्ति क्रिकेटपटू नााही आहे. पण त्याच्या दबदबा विराटपेक्षा जास्त आहे. त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहून तुम्हाला खरा विराट कोण असा प्रश्न पडेल.

गौरव अरोरा सध्या टीकटॉकवर विराट कोहलीचा डुप्लिकेट म्हणून चर्चेत आला आहे. त्यामुळं गौरव टिकटॉक स्टार झाला आहे. गौरवचे 40 लाख फॉलोअर्स असून विराटच्या नावाची जर्सी परिधान करून गौरव टिकटॉकवर व्हिडिओ अपलोड करत असतो. काही व्हिडिओमध्ये तर तो विराटची नक्कल करतानाही दिसत आहे.

Loading...

विराटचे चाहतेही हा गौरवचे व्हिडिओ पाहून तो अचंबित झाले आहेत. त्यामुळं सलमान खान, रणवीर सिंह, रणबीर कपूर यांच्यानंतर विराट कोहलीचा हा डुप्लिकेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुसरीकडे विराट आपल्या पत्नीसोबत वाढदिवस साजरा करत आहे. विराट पत्नी अनुष्कासोबत भूटानमध्ये आहे. वाढदिवसानिमित्त विराटने स्वत:लाच शुभेच्छा देणारं एक पत्र लिहलं आहे. त्यानं हे पत्र 15 वर्षीय विराटला लिहलं आहे. विराटने पत्रात म्हटलं की, सर्वात आधी चिकूला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा. मला माहिती आहे की तुझ्या भविष्याबद्दल खूप सारे प्रश्न तुझ्याकडे आहेत. पण माझ्याकडे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं नाहीत. मला नाही माहिती की तुला काय सरप्राइज मिळेल आणि कोणती आव्हाने तुझ्यासमोर असतील. हे सर्व खूपच रोमांचक असेल. तुला हे आता नाही समजणार असं विराटने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 05:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...