सचिनच्या मुलीला पत्नी मानणाऱ्या भामट्यानं केली होती साराच्या अपहरणाची तयारी, पण...

सचिनच्या मुलीला पत्नी मानणाऱ्या भामट्यानं केली होती साराच्या अपहरणाची तयारी, पण...

साराचा बॉलीवूडशी काहीही संबंध नसला तरी, तिच्या ग्लॅमरस लुकमुळं ती नेहमी चर्चेत असते.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची ओळख आजही क्रिकेटचा देव म्हणून केली जाते. क्रिकेट चाहत्यांमध्ये आजही त्याची तेवढीच क्रेझ आहे. मात्र काही वर्षांपूर्वी अशाच एका चाहत्यानं सचिनला भयंकर त्रास दिला होता. आज सचिनची मुलगी सारा तेंडुलकर हीचा वाढदिवस आहे.

साराचा बॉलीवूडशी काहीही संबंध नसला तरी, तिच्या ग्लॅमरस लुकमुळं ती नेहमी चर्चेत असते. मात्र काही वर्षांपूर्वी एका फोन कॉलमुळं सारा हैराण झाली होती. या गोष्टीची चर्चेत मिडीयामध्ये रंगली होती. काही वर्षांपूर्वी साराची एका भामट्यानं छेड काढली होती. पश्चिम बंगलाच्या पूर्व मिदनापूर येथील एक मनोरुग्न मुंबईत साराला भेटण्यासाठी आला होता. त्यानं साराला एक-दोन नाही तर तब्बल 20वेळा फोन केले होते. त्यानंतर तेंडुलकर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

🍓

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar) on

दरम्यान या भामट्याच्या चौकशी दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. या भामट्यानं साराचे अपरहरण करण्याची धमकीही दिली होती. तसेच, सारा ही त्याची पत्नी असल्याचे त्यानं चौकशी दरम्यान सांगितले होते. या सगळ्या प्रकारामुळं तेंडुलकर कुटुंबिय वैतागले होते. आरोपीनं साराला एका सामन्यादरम्यान पाहिले होते. त्यानंतर तो साराच्या प्रेमात पडला.

चौकशी दरम्यान पोलिसांना आरोपीची डायरीही मिळाली होती. यात त्यानं साराचे नाव आपली पत्नी असे लिहिले होते. दरम्यान पोलिस चौकशीत हा आरोपी मनोरूग्ण असल्याचे निष्पण्ण झाले होते.

साराचा जन्म 12 ऑक्टोबर 1997मध्ये झाला. भारतानं सहारा कप जिंकल्यानंतर सचिननं तिचे नाव सारा ठेवले. सारा सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.

 

View this post on Instagram

 

🌸

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar) on

सोशल मीडियावर साराच्या ग्लॅमरस फोटोची नेहमीच चर्चा असते. बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर देणारे साराचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असताता.

कुस्ती 'अशां'सोबत होत नाही, हातवारे करून पवारांनी फडणवीसांना फटकारले, पाहा हा VIDEO

Published by: Priyanka Gawde
First published: October 12, 2019, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading