मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Happy Birthday Sachin: सचिननं वाढदिवशी केलं कळकळीचं आवाहन, पाहा VIDEO

Happy Birthday Sachin: सचिननं वाढदिवशी केलं कळकळीचं आवाहन, पाहा VIDEO

सचिननं (Sachin Tendulkar) त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलाय. यामध्ये त्याने मागच्या महिन्यातील अनुभव सांगितला असून सर्वांना एक कळकळीचं आवाहन केलं आहे.

सचिननं (Sachin Tendulkar) त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलाय. यामध्ये त्याने मागच्या महिन्यातील अनुभव सांगितला असून सर्वांना एक कळकळीचं आवाहन केलं आहे.

सचिननं (Sachin Tendulkar) त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलाय. यामध्ये त्याने मागच्या महिन्यातील अनुभव सांगितला असून सर्वांना एक कळकळीचं आवाहन केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 एप्रिल : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tedulkar) आज (24 एप्रिल) वाढदिवस आहे.  वयाच्या 16 व्या वर्षी सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 1989 ते 2013 या 24 वर्षांच्या कालावधीमध्ये सचिननं अनेक विक्रम केले. टीम इंडियाला संस्मरणीय विजय मिळवून दिले. त्याचबरोबर क्रिकेट फॅन्सना आयुष्यभर पुरतील इतक्या आठवणी दिल्या. सचिनचं क्रिकेटमधील योगदान लक्षात घेऊन त्याला भारतरत्न (Bharat Ratna) या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्करानं गौरवण्यात आलं आहे. भारतरत्न पुरस्कार मिळालेला सचिन हा देशातील एकमेव खेळाडू आहे.

सचिनच्या वाढदिवसानिमित्तानं जगभरातून सचिनला शुभेच्छा देण्यात येत आहेत. सचिनच्या फॅन्ससाठी तर हा दिवस एखाद्या सणासारखाच असतो. सचिनला मागच्या महिन्यात कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यामधून तो नुकताच बरा झाला आहे.

सचिननं सर्वांचे शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत. त्यानं एक व्हिडीओ त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलाय. यामध्ये त्याने मागच्या महिन्यातील अनुभव सांगितला असून सर्वांना एक कळकळीचं आवाहन केलं आहे.

"मागचा महिना माझ्यासाठी आव्हानात्मक होता. मला कोव्हिड पॉझिटिव्ह आढळलो. मी 21 दिवस सर्वांपासून  तुमच्या सर्वांच्या, माझ्या कुटुंबीयांच्या तसंच मित्रांच्या शुभेच्छा आणि प्रार्थना माझ्यासोबत होत्या. माझ्यावर उपचार करणारे सर्व डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ यांनी सर्वांनी मी बरा होण्यासाठी मदत केली. तुमचे सर्वांचे खूप खूप आभार.'' असं सचिन सुरुवातीला म्हणाला.

सर्वांचे आभार मानल्यानंतर सचिननं एक आवाहन केलं. " मला एक डॉक्टरांनी सांगितलेला मेसेज तुम्हाला द्यायचा आहे. मी मागच्या वर्षी प्लाझ्मा डोनेशन सेंटरचं उद्घाटन केलं.  प्लाझ्मा जर योग्यवेळी मिळाला तर रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. मी योग्य वेळी प्लाझ्मा (Plasma) दान करणार आहे. माझं याबाबत डॉक्टरांशी बोलणं झालं आहे. तुमच्यापैकी जे कुणी Covid 19 मधून बरे झाले आहेत, त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करावी आणि जेंव्हा शक्य असेल तेंव्हा प्लीज प्लाझ्मा दान करावे. त्यामुळे बराच त्रास कमी होईल. हा त्रास काय असतो ते तुम्हाला माहिती आहे. त्याचा तुम्हाला, तुमच्या कुटुंबीयांना आणि  मित्रांही त्रास होतो, तो त्रास कमी व्हावा यासाठी प्लीज प्लाझ्मा दान करा' असं आवाहन सचिननं केलं आहे.

सचिनचं पहिल्यांदा पेपरमध्ये नाव कसं आलं? वाचा 'मास्टर ब्लास्टर'चा 'तो' किस्सा

देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना उपचारासाठी प्लाझ्माची तातडीनं गरज असते. त्यामुळे सचिननं त्याच्या वाढदिवशी प्लाझ्मा दान करण्याच्या केलेल्या आवाहानाचा सकारात्मक परिणाम होईल आणि अनेकांचं आयुष्य यामुळे वाचेल, अशी आशा आहे.

First published:

Tags: Covid-19, Sachin tendulkar