Happy Birthday Rishab Pant : गुरुद्वारात राहिला, सामन्यादरम्यान वडिलांना गमावलं पण क्रिकेट नाही सोडलं!

Happy Birthday Rishab Pant : गुरुद्वारात राहिला, सामन्यादरम्यान वडिलांना गमावलं पण क्रिकेट नाही सोडलं!

Happy Birthday Rishab Pant : या युवा खेळाडूचे स्ट्रगल वाचल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर : एक हरहुन्नरी फलंदाज होण्यासाठी खेळाडूंना खुप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी कधीकधी असे त्याग करावे लागतात, ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही. अशाच एका युवा खेळाडूनं भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी अवर्णनीय मेहनत केली. हा युवा फलंदाज आहे, भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत. ऋषभ पंतचा आज 22वा जन्मदिवस आहे. उत्तरराखंडमध्ये जन्मलेल्या पंतनं क्रिकेट खेळण्यापासून ते टीम इंडियात जागा मिळवण्यापर्यंत अहोरात्र मेहनत केली.

पंतने क्रिकेट खेळायला जेव्हा सुरूवात केली तेव्हा तो दिल्लीतील गुरूद्वाऱ्यात झोपायचा आणि जेवणाची सोय म्हणून तिथेच लंगरही खायचा. ऋषभने दिल्लीच्या सोनेट क्लबमधून क्रिकेटचे धडे गिरवले. या क्लबचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी क्रिकेटचा एक कॅम्प ठेवला होता. या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी ऋषभ रुडकी येथून यायचा.

सोनेट क्लबमध्ये दर शनिवार - रविवारी ट्रेनिंग असायची. या ट्रेनिंगसाठी तो मोतीबाग गुरूद्वारात थांबायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी लंगरमध्ये काही खाल्यानंतर ऋषभ क्लबमध्ये जायचा आणि रविवारी ट्रेनिंग संपल्यावर रुडकी येथील घरी जायचा. अनेक वर्ष गुरुद्वारामध्ये राहिल्यानंतर ऋषभच्या घरातल्यांनी दिल्ली येथील छतरपुरमध्ये एक घर भाड्याने घेतले. पंतने 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट टीमपासूनतच आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला.

वाचा-भारताचा दिग्गज क्रिकेटपटू परदेशात खेळण्यासाठी निवृत्ती घेणार?

वडिलांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी खेळला सामना

ऋषभच्या आक्रमक खेळीचे नेहमीच कौतुक केले जाते. मात्र 2017मध्ये ऋषभच्या आयुष्यात खुप मोठी घटना घडली. त्याचे बाबा राजेंद्र पंत यांचे निधन झाले. या प्रसंगात आपल्या कुटुंबासोबत राहून त्यांचे सांतवन केले जाते, मात्र पंतनं या प्रसंगातही क्रिकेट सोडले नाही. आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतनं सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. दुसऱ्याच दिवशी ऋषभनं आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून फलंदाज केली. आणि 33 चेंडूत अर्धशतकही केले.

वाचा-खेळाडूंसोबत पत्नी, मैत्रिणी असणं फायद्याचं, सानिया मिर्झाने सांगितलं कारण

सिक्स लगावत कसोटी सामन्याची केली होती सुरुवात

गेल्या वर्षी इंग्लंमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात पंतनं आपल्या पदार्पणातच जबरदस्त कामगिरी केली. पहिल्याच चेंडूत षटकार लगावत, त्यानं पहिल्या डावात 25 धावा केल्या. मात्र सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका विरोधातल्या कसोटी सामन्यात पंतला संघात जागा मिळाली.

असे आहेत पंतचे रेकॉर्ड

ऋषभ पंतनं टीम इंडियाकडून आतापर्यंत 11 कसोटी, 12 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्यानं कसोटीत 754, टी-20मध्ये 325 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 229 धावा केल्या आहेत.

वाचा-मयंकला संघातून वगळण्यात येणार होतं, एका सल्ल्यानंतर झळकावलं त्रिशतक

VIDEO: प्रकाश मेहतांच्या समर्थकांकडून पराग शाहांच्या गाडीची तोडफोड

Published by: Priyanka Gawde
First published: October 4, 2019, 1:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading