Happy Birthday Rahul Dravid : सेहवागने राहुल द्रविडची मिक्सरशी केली तुलना, मजेशीर ट्वीटची सगळीकडे चर्चा

Happy Birthday Rahul Dravid : सेहवागने राहुल द्रविडची मिक्सरशी केली तुलना, मजेशीर ट्वीटची सगळीकडे चर्चा

वॉल म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याचा आज 47वा वाढदिवस आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जानेवारी : भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. सेहवाग हा त्याच्या मजेदार ट्वीटमुळे ओळखला जातो. असेच त्याचे एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेहवागनं भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याच्या वाढदिवसानिमित्त एक ट्वीट केले.

वॉल म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आज 47 वर्षांचा झाला आहे. द्रविडचा जन्म 11 जानेवारी 1973मध्ये इंदूरमध्ये झाला. दरम्यान बीसीसीआयनं राहुल द्रविडच्या सर्वश्रेष्ठ खेळींचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

तर, वीरूनं द्रविडसोबत फोटो टाकत एका खास अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या. सेहवागनं, “मला वाटायचे की, कुटण्यासाठी किचनमध्ये मिक्सर ग्राइंडर वापरतात. मात्र द्रविडनं आम्हाला शिकवलं की मैदानावरही असे होऊ शकते. #HappyBirthdayRahulDravid', असे मजेदार ट्वीट केले.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही राहुल द्रविडला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सचिननं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा जिम्मी. तुझ्या पध्दतीनं खेळलास त्यानं गोलंदाजांची स्वप्न भंग केलीस', अशा शुभेच्छा दिल्या.

राहुल द्रविडनं 1996मध्ये लॉर्ड्समध्ये सौरव गांगुलीसोबत पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यात द्रविडनं 95 धावांची खेळी केली होती. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पदार्पण करणाऱ्या खेळाडूंनी दोन शानदार खेळी केल्या होत्या. भारतीय संघात केवळ सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड असे दोन फलंदाज आहेत ज्यांनी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजारहून जास्त धावा केल्या आहेत.

द्रविडने कसोटीमध्ये 13 हजार 288 धावा केल्या आहेत. यात 36 शतक आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्रविडनं 10 हजार 889 धावा केल्या आहेत. यात 12 शतकांचा समावेश आहे. केवळ फलंदाज म्हणून नाही तर फिल्डर म्हणूनही द्रविडची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. द्रविडनं 301 डावांमध्ये 210 कॅच घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. कर्णधार म्हणूनही द्रविडनं भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतानं दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी मालिका विजय मिळवला होता. त्याचबरोबर द्रविडच्या नेतृत्वाखालीच भारतानं इंग्लंडवर 21 वर्षांनी कसोटी विजय मिळवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2020 01:21 PM IST

ताज्या बातम्या