Happy Birthday Pragyan Ojha: अखेरच्या मॅचमध्ये टीम इंडियाला जिंकवलं अन् सचिनसोबतच संपलं ‘या’ गोलंदाजाचं करिअर!

सचिनसोबतच नाट्यमयरित्या संपलं ‘या’ गोलंदाजाचं करिअर

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 10:39 AM IST

Happy Birthday Pragyan Ojha: अखेरच्या मॅचमध्ये टीम इंडियाला जिंकवलं अन् सचिनसोबतच संपलं ‘या’ गोलंदाजाचं करिअर!

मुंबई, 05 सप्टेंबर : भारतीय संघात असे असंख्य खेळाडू आहेत, ज्यांचे क्रिकेटमधील करिअर एकही सामना न खेळता संपले. यात भारतीय गोलंदाज आघाडीवर आहे. आज अशाच एका नाट्यमयरित्या निवृत्ती घेतलेल्या गोलंदाजाचा वाढदिवस आहे. या गोलंदाजानं सर्वांचे ज्या दिवसाकडे लक्ष लागले होते. त्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. तो दिवस म्हणजे सचिनचा अखेरचा वेस्ट इंडिज विरोधात झालेला शेवटचा कसोटी सामना. या गोलंदाजानं नाव आहे प्रज्ञान ओझा. डाव्या हाताच्या या फिरकी गोलंदाजाचा आज 33वा वाढदिवस आहे.

ओडिशातील छोट्याशा गावात 5 सप्टेंबर1986मध्ये जन्म झालेल्या प्रज्ञान ओझानं 24 कसोटी, 18 एकदिवसीय आणि 6 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्यानं 144 आंतरराष्ट्रीय विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. या शानदार करिअरनंतरही ओझाला भारतीय संघात संधी मिळाली नाही. अखेर नाट्यमयरित्या ओझाला निवृत्ती घ्यावी लागली.

ओझानं अखेरचा कसोटी सामना 2013मध्ये वेस्ट इंडिज विरोधात खेळला होता. हाच सामना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या करिअरमधला शेवटचा सामना ठरला होता. या सामन्यात ओझानं तब्बल 10 घेतल्या होत्या. या सामन्यात ओझाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला. मात्र हाच सामना ओझाचा शेवटचा ठरला. सचिनच्या निवृत्तीनंतर ओझाही संघाच्या बाहेर राहिला. त्याची भारतीय संघात कधीही निवड झाली नाही.

वाचा-मित्रा आता तरी रडणं बंद कर, भज्जीचे गिलख्रिस्टला 18 वर्षांनंतर सडेतोड उत्तर

याच ओझानं आयपीएलमध्येही कमाल कामगिरी केली. ओझानं तब्बल तीन वेळा आयपीएलचा किताब जिंकला. 2009मध्ये डेक्कन चार्जर्स आणि दोन वेळा मुंबई इंडियन्स (2013 आणि 2015) संघाकडून खेळताना ओझानं आयपीएलचा किताब जिंकला. 2010मध्ये तर आयपीएलमध्ये 21 विकेट घेत ओझा सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज झाला होता. चांगली कामगिरी केल्यानंतरही आयपीएलमधूनही त्याला डावलण्यात आले. ओझानं 2015मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला होता.

Loading...

वाचा-‘ए गणपत चल दारू ला’, त्या एका ट्विटवरून रवी शास्त्री पुन्हा झाले ट्रोल!

2014मध्ये लागला होता बॅन

2014मध्ये ओझावर अक्शन संदिग्ध असल्यामुळं बंदी घालण्यात आली होती. त्याच्या बॉलिंग अक्शनमुळं एका महिन्यानंतर ओझावरची बंदी हटवण्यात आली. 2009मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ओझानं त्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर तिलक रत्ने दिलशानला बाद केले होते. अशी कामगिरी करणार तो पहिला गोलंदाज ठरला होता.

वाचा-जमिनीवर पडला पण थांबला नाही! स्मिथच्या अजब स्टाईलनं प्रेक्षकही चक्रावले

VIDEO: पावसानं घेतली उसंत! लोकल सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 10:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...