मुंबई, 7 जुलै : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीचा आज वाढदिवस (MS Dhoni Birthday) आहे. 7 जुलै 1981 रोजी रांचीमध्ये जन्मलेला धोनी आज 40 वर्षांचा झाला आहे. जगभरातील धोनीचे फॅन्स दरवर्षी हा दिवस मोठ्या आनंदात साजरा करतात. धोनीचे जन्मगाव रांची किंवा त्याचे दुसरे घर असलेले चेन्नई सर्व ठिकाणी असलेल्या या फॅन्ससाठी हा जल्लोषाचा दिवस आहे.
टीम इंडियाचाच नाही तर जगातील बेस्ट कॅप्टनमध्ये महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) समावेश होतो. आयसीसीच्या सर्व स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा धोनी हा एकमेव कॅप्टन आहे. टीम इंडियाची तर एक संपूर्ण पिढी धोनीच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली आहे. धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला असला तरी, त्याच्यासोबत चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) टीमकडून खेळण्याचं जगभरातील क्रिकेटपटूंचं स्वप्न असते. भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलाऱ्या धोनीची टीम इंडियामध्ये निवड सहजासहजी झालेली नाही. त्याला संधी मिळावी म्हणून 10 दिवस प्रयत्न करावे लागले होते.
महेंद्रसिंह धोनीला टीम इंडियात सर्वप्रथम संधी देणाऱ्या निवड समितीचे अध्यक्ष किरण मोरे (Kiran More) यांनी धोनीच्या निवडीची 'अनटोल्ड स्टोरी' Untold Story सांगितली आहे. धोनीला संधी मिळावी म्हणून तत्कालिन टीम इंडियाचा कॅप्टन सौरव गांगुलीची 10 दिवस मनधरणी करावी, लागली असे मोरेंनी सांगितले.
IPL 2022 मध्ये धोनी चेन्नईसोबत असणार का नाही? ऑस्ट्रेलियन खेळाडूने केली भविष्यवाणी
विकेट किपरची होती गरज
टीम इंडियाला 2003 च्या वर्ल्ड कपनंतर आक्रमक बॅटींग करु शकणाऱ्या विकेटकिपरची गरज होती. पार्थिव पटेल, दीपदास गुप्ता आणि दिनेश कार्तिक यांना संधी देण्यात आली. पण, त्यांना याचा पूर्ण फायदा उठवता आला नाही. "आम्ही त्यावेळी 6 व्या किंवा 7 व्या नंबरवर येऊन वेगाने 40-50 रन करु शकणाऱ्या 'पॉवर हिटर'च्या शोधात होतो. राहुल द्रविड वन-डे क्रिकेटमध्ये विकेट कीपिंग करत होता. त्याने विकेट किपर म्हणून 75 मॅच खेळल्या होत्या. त्यामुळे नवा विकेटकिपरचा शोध हा आमचा मुख्य अजेंडा होता." असे मोरे यांनी सांगितले.
10 दिवस करावी लागली मनधरणी
किरण मोरेने पुढे सांगितले की, "निवड समितीच्या एका सदस्याने धोनीचा खेळ पाहिला होता. त्यानंतर मी स्वत: त्याचा खेळ पाहिला. तो आक्रमक बॅट्समन होता. त्याने प्रतिस्पर्धी टीमच्या सर्वच बॉलर्सची धुलाई केली होती. मी पाहिलेल्या मॅचमध्ये धोनीनं 170 आणि 130 रन काढले होते. दुलीप ट्रॉफीची फायनल मॅच ईस्ट झोन विरुद्ध नॉर्थ झोन यांच्यात होणार होती. ईस्ट झोनकडून दीपदास गुप्ता नियमित विकेट किपर होता.
एमएस धोनीने 13 वर्षांनी पूर्ण केलं चाहत्याचं स्वप्न, अशी आहे रंजक कहाणी
धोनीनं फायनलमध्ये विकेट कीपिंग करावी, अशी आमची इच्छा होती. या विषयावर माझा गांगुली आणि दीपदास गुप्ता यांच्याशी मोठा वाद झाला. त्यानंतर या विषयावर गांगुलीची मनधरणी करण्यासाठी मला 10 दिवस लागले. अखेर, गांगुलीनी फायनलमध्ये धोनीला विकेटकिपर म्हणून संधी दिली. फायनलमध्ये धोनीनं चांगला खेळ केला. त्यानंतर लवकरच त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली." असे मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, MS Dhoni, On this Day